गुहागर, ता. 10 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2024 या क्रिक्रेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा दि. 17 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत वरचापाट मोहल्ला स्टेडियम येथे भरविण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील क्रिकेट संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे. Gulzar Cricket Club Tournament announced

या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रु. 15 हजार रुपयांच्या बक्षिसासह चषक देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला रोख रु. 10 हजार रुपयांच्या बक्षिसासह आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांची देखील निवड करुन त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी रु. 1 200/- असून चेंडू फी रु. 100/- आहे. Gulzar Cricket Club Tournament announced
तरी इच्छुक संघांनी नाव नोंदणी करण्यासाठी इफतीकार भाटकर (8412051445), नियाज तुरुक (8655394583) अल्तमश भाटकर (8767814558), हमजा भाटकर (7218665561) साहीम सय्यद (8208153092 )या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे. Gulzar Cricket Club Tournament announced

