गुहागर, ता. 09 : शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन व कथाकथन विषयावर प्रा. सौ. मनाली बावधनकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिगल कॉलेजच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व नूतन वर्षाचे शुभेच्छा कार्ड देऊन स्वागत केले. Guided by Bavdhankar at Regal College
रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सौ. बावधनकर यांनी काव्यवाचन स्पर्धेसाठी पाळायचे नियम जसे की, कवितेची निवड, उत्कृष्ठ विषय, कवितेतील ताल, लय, नाद, सादरीकरण, योग्य शब्दांची निवड कशी करायची. त्याचबरोबर कथाकथन स्पर्धेसाठी पाळायच्या नियमांमध्ये त्यांनी कथा निवड करताना नेहमी कमी पात्रे असणारी, तसेच संस्कार व मुल्ये जपणारी कथा निवडावी. कथा हि नेहमी संवादात्मक असावी. भाषिक व शारीरिक अभिनय आपल्या कथाकथनवेळी दिसायला हवेत असेही त्या म्हणाल्या. कथा निवड करताना नवरसांचा वापर असलेली व श्रोत्याला शेवटपर्यंत जागेवरून हळू न देणारी अशी रसभरीत कथा निवडावी. विद्यार्थ्यांना रोज कमीतकमी अर्धा तास तरी अवांतर वाचन करावे. Guided by Bavdhankar at Regal College

माधुरी शानबाग, सुधा मूर्ती, पु.ल. देशपांडे, ज.मा. मिरासदार आदी लेखकांचे साहित्य वाचण्याचे आवाहन केले. चांगले वाचन करा व नेहमी हसत रहा. यावेळी त्यांनी कोकणातील मुलांसाठी व्यावसायिक शिक्षणाची अल्पशुल्कात संधी देणाऱ्या रिगल कॉलेजचे कौतुक केले. व रिगलचे भविष्य उज्ज्वल आहे, असे त्या म्हणाल्या. Guided by Bavdhankar at Regal College

विद्यार्थ्यांना मराठी वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्यामध्ये मातृभाषेबद्दल अधिक सजगता निर्माण व्हावी, या हेतूने रिगल कॉलेज शृंगारतळीकडून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रा. सौ. रेश्मा मोरे यांनी सांगितले. यावेळी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. Guided by Bavdhankar at Regal College

