• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी सीए शाखेतर्फे मार्गदर्शन सत्र

by Guhagar News
April 28, 2024
in Ratnagiri
47 0
0
Guidance session by CA branch

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित चर्चासत्रावेळी व्याख्यात्या सीए अमृता कुलकर्णी यांचे स्वागत करताना रत्नागिरी शाखाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये. डावीकडून सीए केदार करंबेळकर, सीए शैलेश हळबे

92
SHARES
262
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 28 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने पीअर रिव्ह्यू आणि जीएसटीमधील सध्याचे प्रश्न या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे आयोजित सत्रात पुणे सीए शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी आणि रत्नागिरीतील अॅड. अभिजित बेर्डे यांनी मार्गदर्शन केले. Guidance session by CA branch

पहिल्या सत्राच्या सीए अमृता कुलकर्णी यांनी पीअर रिव्ह्यूसाठी चार्टर्ड अकाउंटंट्सनी आपल्या कार्यालयामध्ये लेखा परीक्षणासंदर्भातील दस्तऐवज आणि कागदपत्र यांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. लेखा परीक्षण करताना अवलंबलेल्या प्रक्रिया आणि पद्धती योग्य रितीने कशा नोंद करून ठेवाव्यात, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. सीए इन्स्टिट्यूटने सनदी लेखापालांच्या कामाचे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेल्या पीअर रिव्ह्यू बोर्ड आणि त्यांच्या कार्यप्रणालीची ही थोडक्यात माहिती त्यांनी दिली. Guidance session by CA branch

Guidance session by CA branch
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सीए अमृता कुलकर्णी

दुपारच्या सत्रात रत्नागिरीतील प्रसिद्ध जीएसटी सल्लागार अॅड. अभिजित बेर्डे यांनी जीएसटी कायद्यतील विविध प्रश्न आणि त्यासंदर्भातील सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयांवर चर्चा केली. जीएसटी नोंदणी, अपील, जमिनींच्या व्यवहारावरील कर आकारणी, उत्खनन रॉयल्टीसंदर्भातील जीएसटी तरतुदी या संदर्भातील सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जीएसटी अॅडव्हान्स रुलिंग अॅथॉरिटीच्या निर्णयांच्या अनुषंगाने सखोल विवेचन त्यांनी केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना चर्चेच्या माध्यमातून समर्पक अशी उत्तरे दिली. Guidance session by CA branch

Guidance session by CA branch
उपस्थित सीए

सरस्वतीपूजन, दीपप्रज्वलन व सीए मोटो सॉंगने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांनी सीए अमृता कुलकर्णी यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात सीए अभिलाषा मुळये यांनी चर्चासत्रातील विषयांचे महत्व विशद केले. सूत्रसंचालन सीए नयन सुर्वे यांनी केले. याप्रसंगी सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेचे उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, समिती सदस्य सीए प्रसाद आचरेकर आदींसह बहुसंख्य सीए उपस्थित होते. सचिव सीए केदार करंबेळकर यांनी आभार मानले. Guidance session by CA branch

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuidance session by CA branchLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.