• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 August 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षासंदर्भात मार्गदर्शन

by Mayuresh Patnakar
August 13, 2026
in Guhagar
31 1
0
Guidance session at Patpanhale College
61
SHARES
175
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ध्येयावर लक्ष केंद्रित करुन स्वप्न पूर्ण करणे अवघड नाही; बिरदेव डोणे

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पाटपन्हाळे येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्षाच्या वतीने “स्पर्धा परीक्षा मधील असणारी संधी” या विषयावर मागील वर्षी यूपीएससी परीक्षेमध्ये निवड झालेले आणि पश्चिम बंगाल मध्ये नियुक्त झालेले श्री. बिरदेव डोणे (आयपीएस अधिकारी) यांचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  Guidance session at Patpanhale College

Guidance session at Patpanhale College

बिरदेव डोणे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सुरुवातीला आपल्या यशस्वी जीवनाचा वाटचाल सांगून त्यांच्या विद्यार्थी दशेतील त्यांचे अनुभव कथन केले. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशाप्रकारे करावयाची आणि कोणत्या गोष्टी करावयाच्या की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीनुसार यश मिळेल हे स्पष्ट केले. स्वप्ने पहा पण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जी जिद्द लागते ती कायम ठेवा. ती जर नसेल तर स्वप्ने पाहण्यात काही अर्थ नाही. यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा किंवा जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वप्न पहा, स्वप्नाकडे जाण्याचा मार्ग निश्चित करा आणि निवडलेल्या मार्गावर सातत्य ठेवा या त्रिसूत्रीचा वापर केल्यास हमखास यश मिळेल. ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास स्वप्न करणे अवघड नाही असे सांगितले.  Guidance session at Patpanhale College

Guidance session at Patpanhale College

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना संख्यात्मक आणि गुणात्मक अभ्यासक्रम कसा करावा हे सांगून परीक्षा किंवा आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा अपयश येते परंतु त्या अपयशाचा सामना करता आले पाहिजे हे त्यांनी सांगितले. जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर आपल्याला कोणतेही आव्हान अशक्य नाही हे त्यांनी सांगितले. कोकणातील विद्यार्थी खूप हुशार आहेत, दहावी आणि बारावीच्या बोर्डामध्ये कोकणातील मुले पुढे असतात परंतु स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये ही मुले खूप मागे असतात. कोकणातील विद्यार्थ्यांनी केवळ मुंबईचा विचार न करता या ठिकाणी राहून स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये यशस्वी व्हावे असे सांगितले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड नाही त्यांना ज्यामध्ये आवड आहे त्यांनी कोकणामध्ये विविध प्रकारच्या संधी आहेत त्याचा उपयोग करून चांगल्या पद्धतीनुसार आपल्याला करिअर कसे करता हे सांगून सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांनी सकारात्मक पद्धतीने कसा करता येईल हे स्पष्ट केले.  Guidance session at Patpanhale College

Guidance session at Patpanhale College

विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर कोणतेही आव्हान त्यांच्यासाठी अशक्य असते फक्त प्रामाणिक जिद्द असावी लागते त्यासाठी आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी आपल्याला सहज यशस्वी होता येते हे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवले त्यांचा सत्कार श्री बिरदेव डोणे सर यांच्या हस्ते करण्यात आला.  Guidance session at Patpanhale College

या कार्यक्रमाला कोल्हापूरहून आलेले वासुदेव कांबळे, तानाजी दळवी, रवींद्र खोत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी ए देसाई वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस एस खोत तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी पवार हिने तर समारोप कु. समृद्धी घाणेकर हिने केला. कार्यक्रमाच्या शेवटी अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा विषयी अनेक प्रश्न विचारले आणि त्याला समर्पक अशी उत्तरे श्री बिरदेव डोणे सर यांनी दिली. Guidance session at Patpanhale College

Tags: GuhagarGuhagar NewsGuidance session at Patpanhale CollegeLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.