गुहागर, ता. 14 : निरनिराळ्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी असलेल्या रिगल कॉलेज शृंगारतळी येथे रविवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता गुहागर तालुक्यामध्ये प्रथमच इ.दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी JEEE/NEET या परीक्षांबद्दल मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ.सौ सुमिता शिर्के यांनी केले आहे. Guidance Camp for JEEE/NEET at Regal College
जेईई व नीट या परीक्षांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यातील पंधरा वर्षाहून अधिक अनुभव असणारे तज्ञ प्रा.नारायण सिंग सर मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जसे की जेईई व नीट परीक्षा म्हणजे काय? या परीक्षेची तयारी कशी करायची? या परीक्षेचे फायदे काय आहेत? या परीक्षेचे महत्त्व काय आहे? अशा अनेक प्रश्नांचे व शंकांचे निरसन प्राचार्य नारायण सिंग यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ८३२९१०४८७६ / ८४५९०२६१९२ / ७७६८९८८५८४ / ९३७३६२१९५० या क्रमांकावर संपर्क साधावा. Guidance Camp for JEEE/NEET at Regal College
रिगल कॉलेजमध्ये जेईई व नीट या मेडिकल व इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच तज्ञ मार्गदर्शकांकडून घेतला जातो. आज या दोन्ही परीक्षांचे महत्त्व वाढीस लागलेले आहे. रिगल कॉलेज चिपळूण कडून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाला अल्पावधीतच विद्यार्थ्यांची पसंती मिळालेली आहे व याचा उत्कृष्ट निकाल मिळून विद्यार्थ्यांचे डॉक्टर व इंजिनियर होण्याचे स्वप्न साकारताना दिसत आहे. कोकण विभागामध्ये या परीक्षांबद्दल जागृती होऊन जास्तीत जास्त विद्यार्थी उत्कृष्ट डॉक्टर व इंजिनियर बनावेत हा यामागील उद्देश आहे. Guidance Camp for JEEE/NEET at Regal College