रत्नागिरी, ता. 17 : आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून रविवार दि. १८ जुन २०२३ रोजी जन्मतः श्रवणदोष असणाऱ्या, ऐकण्याचा त्रास असलेल्या किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलतांना अडचण येणाऱ्या अशा सर्व बालकांसाठी व त्यांच्या पालकांसाठी मोफत मार्गदर्शक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते ४ या वेळेत “आस्था थेरेपी सेंटर ” छत्रपती शिवाजी स्टेडियम मारुती मंदिर, रत्नागिरी येथे हे शिबिर होणार आहे. Guidance camp for hearing impaired children

या शिबिरात डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई मुंबईच्या प्रसिद्ध कान- नाक -घसा सर्जन डॉ. काश्मीरा चव्हाण या लहान मुलांची तपासणी करणार आहेत. तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या संदर्भ सेवा व त्यांच्या पालकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. ऑडिओलॉजिस्ट श्रीम. प्राजक्ता भोगटे या देखील मुलांच्या बोलण्या संदर्भातील समस्यांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. Guidance camp for hearing impaired children
या शिबिराला येतांना पालकांनी मुलांच्या पूर्व तपासणी केलेले रिपोर्ट सोबत आणावेत. Guidance camp for hearing impaired children
