• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्याचा पहिला हिरा प्रो कबड्डीमध्ये दाखल

by Guhagar News
June 3, 2025
in Guhagar
683 7
0
Guhagar's Shubham Rahate joins Pro Kabaddi
1.3k
SHARES
3.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील पिंपर गावचा सुपुत्र कु. शुभम सुनिल रहाटे या खेळाडूची प्रो कबड्डी लीगमधील ‘बंगळूरु बुल्स’ संघात निवड झाल्याची आनंददायक बातमी समोर आली आहे. स्थानिक पातळीवरील श्री.विठ्ठलाईदेवी क्रिडा मंडळ अडूर व व्यावसायिक स्तरावर विजय क्लब मुंबई या संघांचे प्रतिनिधित्व करताना दाखवलेल्या उत्कृष्ट खेळामुळे त्याला ही सुवर्णसंधी प्राप्त झाली. ट्रायल्समध्ये फिजिकल फिटनेस, गेम सेंस, डिफेन्स/रेडिंग कौशल्य या मूल्यांकन आधारावर त्याची निवड करण्यात आली. सन २०१४ पासून सुरू झालेली प्रो कबड्डी लीग देशातील सर्वात मोठ्या क्रीडा लीग पैकी एक मानली जाते. आतापर्यंत आठ वेगवेगळ्या संघांनी विजेतेपद जिंकले आहे. Guhagar’s Shubham Rahate joins Pro Kabaddi

दि. ३१ मे आणि ०१ जून रोजी मुंबईत पार पडलेल्या खेळाडूंचे ऑक्शन मध्ये ‘बंगळूरु बुल्स’ संघामार्फत शुभमची निवड झाली. प्रो कबड्डी लीगचा यंदाचा बारावा सीजन आहे. शुभम याने आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुका, जिल्हा, राज्य आणि आता राष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. गुहागर तालुक्यातील पहिला खेळाडू शुभमच्या रूपाने प्रो कबड्डीमध्ये दाखल झाल्याने खेळाडूंमध्ये आता नवचैतन्य निर्माण झालं आहे.  लवकरच इथून आणखी खेळाडू राष्ट्रीय स्तरावर झळकतील यात शंका नाही. हा खेळाडू केवळ स्वतःचीच नाही तर संपूर्ण तालुक्याची ओळख प्रो कबड्डीमध्ये नेतो आहे. ग्रामीण भागातूनही जागतिक पातळीवरचा खेळ खेळता येतो हे त्याने सिद्ध केलं आहे. त्याच्या दमदार खेळाने आता थेट प्रो कबड्डी लीगमध्ये आपल्या खेळाची चुणूक दाखवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. त्याच्या या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Guhagar’s Shubham Rahate joins Pro Kabaddi

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuhagar's Shubham Rahate joins Pro KabaddiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share537SendTweet336
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.