गुहागरात निषेध मोर्चा, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
गुहागर, ता. 13 : शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यात दाखविण्यात आलेली सीआझेडची 200 मिटर रेषा 2011 प्रमाणे आहे. गेल्या बारा वर्षांमध्ये सदर रेषेचे पुनर्परीक्षण झालेले नाही. त्यामुळे सीआरझेडच्या नव्या 200 मिटर रेषेची निश्चित झाल्यानंतर व गुहागर नगरपंचायत सीआझेड 2 समाविष्ट केल्यानंतरच शहराचा विकास आराखडा बनवावा. असे निवेदन आज गुहागर शहरातील नागरिकांच्यावतीने गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे व नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांना देण्यात आले. Guhagarkar united against the development plan


गुहागर शहराचा विकास आराखडा रद्द व्हावा, यासाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील सर्व वाड्यावस्त्यांमधील महिला, पुरुष सहभागी झाले होते. गुहागरचे ग्रामदैवत भैरी व्याघ्रांबरी मंदिरातून नगरपंचायत कार्यालयापर्यत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आवरा रस्त्यांना सावरा गुहागरला, काम करु लाख मोलाचे निसर्ग आणि गुहागर रक्षणाचे, गुहागर भकास करणारा विकास आराखडा रद्द करा असे फलक झळकावण्यात आले होते. ध्वनीक्षेपकावरुन देण्यात येणाऱ्या घोषणांनी आसमंत दुमदुमुन गेला होता. श्री भैरी व्याघ्रांबरी मंदिरापासून सकाळी 10 वा. मोर्चाला सुरवात झाली. तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा काही काळ थांबला. नागरिक मंचाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार सौ. वराळे यांना विकास आराखडा रद्द करण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर हा मोर्चा थेट गुहागर नगरपंचायत कार्यालयावर येऊन धडकला. Guhagarkar united against the development plan


येथे नागरिक मंचचे कार्यकर्ते दिपक कनगुटकर, माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे, मयुरेश साखरकर, शामकांत खातू, सिद्धेश आरेकर, निलेश मोरे, संगम मोरे, राकेश साखरकर, अमरदिप परचुरे, आदिनीं विकास आराखडा का नको याबाबत माहिती दिली. त्यानंतर नागरिक मंचांच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांची भेट घेवून विकास आराखडा रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले. Guhagarkar united against the development plan

