• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विजापूर महामार्गाच्या अर्धवट कामाला 1 एप्रिलपासून सुरवात

by Mayuresh Patnakar
March 28, 2023
in Travel
408 4
0
Guhagar Vijapur Highway
801
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

डॉ.  विनय नातू, अर्धवट कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा शब्द

गुहागर, ता. 28 : गुहागर विजापूर महामार्गाचे काम रामपूरपर्यंत झाले आहे. मात्र यामध्ये अर्धवट असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्र्वासन ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चिपळूणचे उपअभियंता यांनी दिले आहे. अशी माहिती डॉ. विनय नातू यांनी दै. सकाळला दिली. Guhagar Vijapur Highway

फेब्रुवारी महिन्यात खासदार सुनील तटकरेंनी गुहागरमध्ये महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी गुहागर शहरातील शून्य कि.मी. पासून शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या कामासाठी भुसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना प्रांत प्रविण पवार यांना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे रत्नागिरीत झालेल्या दिशाच्या बैठकीमध्येही गुहागर विजापूर महामार्गाच्या अर्धवट कामाबाबत चर्चा झाली. Guhagar Vijapur Highway

खासदार सुनील तटकरेंनी केलेल्या सूचनेप्रमाणे प्रांत प्रविण पवार यांनी गुहागरमध्ये बैठक घेतली. शून्य कि.मी.पासून विश्रामगृहापर्यंतच्या रस्ता रुंदिकरणात किती जागा जातात याची माहिती दिली.  या मार्गावरील मालमत्ताधारकांना जागा रिकामा करण्यासाठी 10 मे पर्यंतची मुदत दिली.  हा बैठकीच्या यशस्वीतेनंतर ठेकेदाराने कामाला सुरवात करणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. Guhagar Vijapur Highway

अखेर माजी आमदार व उत्तर रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनीही पाठपुरावा सुरु केला. या संदर्भात डॉ. नातूंनी पत्रव्यवहार केल्यानंतर सोमवारी (ता. 27) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चिपळूणचे उपअभियंता यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीला ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये चिखली व शृंगारतळीतील पुलांचे काम, मार्गताम्हाने व काजळी येथील अर्धवट काम, मोडकाआगर पुलाला जोडणारा रस्ता, गुहागरमधील महामार्गाचे कामबाबत चर्चा झाली. Guhagar Vijapur Highway

यावेळी 1 एप्रिलपासून गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील जलवाहीन्यांच्या कामाला सुरवात होईल. जलवाहीन्यांचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला सुरवात होईल असे सांगितले. तसेच चिखली व शृंगारतळीतील नव्या पुलाचे बांधकामही ठेकेदार 1 एप्रिलपासून करणार आहे. याच दरम्यान काजळीतील अर्धवट रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. ही कामे पूर्ण होतानाच मार्गताम्हाने बाजारपेठ व गुहागर बाजारपेठ नाक्यातील काम हाती घेतली जातील. अशी माहिती ठेकेदाराने दिली असल्याचे डॉ. नातू यांनी सांगितले आहे. Guhagar Vijapur Highway

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuhagar Vijapur HighwayLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share320SendTweet200
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.