प्रांत पवार यांनी घेतली बैठक, ग्रामस्थांचे सहकार्याचे आश्र्वासन
गुहागर, ता. 03 : प्रांत प्रविण पवार यांच्या विनंतीला मान देवून मोबदला मिळण्यापूर्वी महामार्गाचे कामाला जागा देवू. असे आश्वासन गुहागरमधील जागामालकांनी दिले. त्यामुळे शुन्य कि.मी.पासून न्यायालयापर्यंत अपूर्ण असलेल्या महामार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. महामार्गातील अडचणी दूर करण्यासाठी प्रांत प्रविण पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर तहसील कार्यालयात शुक्रवारी (ता. 3) बैठक झाली. Guhagar Vijapur Highway

भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करताच महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदार गुहागर विजापूर महामार्गाचे काम करत होते. गुहागर शहराच्या हद्दीतील ग्रामस्थांनी एप्रिल 2022 मध्ये हे काम रोखले. महामार्गासाठी कोणाची, किती जमीन जाणार, मोबदला किती मिळणार याची माहिती मिळत नाही तोवर महामार्गाचे काम करता येणार नाही. असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे गुहागरातील शुन्य कि.मी.पासून न्यायालयापर्यंतचे काम अर्धवट सोडण्यात आले होते. Guhagar Vijapur Highway

शनिवारी (ता. 25 फेब्रुवारी) खासदार सुनील तटकरे यांनी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी गुहागरमध्ये बैठक घेण्याची सुचना दूरध्वनीवरुन प्रांत प्रविण पवार यांना केली होती. आज प्रांत प्रविण पवार यांनी महामार्ग प्राधिकरण, भूमि अभिलेख या विभांगाचे अधिकारी आणि ठेकेदाराचे प्रतिनिधी यांना सोबत घेवून तहसील कार्यालय गुहागर येथे बैठक घेतली. या बैठकीला नगराध्यक्ष राजेश बेंडल, तहसीलदा सौ. प्रतिभा वराळे, मोडकाआगर पर्यंतच्या महामार्गावरील सर्व जागा मालक आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रविण पवार यांनी शुन्य कि.मी. पासून न्यायालयापर्यंतच्या महामार्गाच्या दुतर्फा कोणत्या जमीनी जात आहेत त्याची माहिती नागरिकांना दिली. यावेळी मोबदल्याविषयी शासनाची भुमिका स्पष्ट करताना प्रांत म्हणाले की, ज्यांची बांधकामे अतिक्रमण स्वरुपातील आहेत त्यांना कोणताही मोबदला मिळणार नाही. आज काही जागा मालकांच्या कोर्ट केस सुरु आहेत त्यांच्या मोबदल्याचा विषय केसच्या निकालानंतर होईल. उर्वरित जागेमध्ये असलेल्या बांधकामाचा विचार करुन महामार्गाने ठरवून दिलेल्या सुत्राप्रमाणे दर निश्चित करुन रक्कम जागा मालकांच्या खात्यात जमा होईल. मात्र या सर्व प्रक्रियेला अजुनही काही काळ जाईल. दरम्यान ज्या नागरिकांची समंती असेल तेथील महामार्गाच्या कामे सुरु होईल. 14 मे 2023 पर्यंत संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करुन कायदेशीररीत्या भुसंपादन केले जाईल. कामाची सुरवात जलवाहीन्या, वीजवाहीन्यांच्या कामाने होईल. Guhagar Vijapur Highway

यावेळी उपस्थित नागरिकांनी महामार्गाला जोडणारे रस्ते आणि घरांचे रस्ते ठेकेदाराने पुन्हा बांधुन द्यावेत. जागा व घराचा भाग जाणार भाग शासनाने चिन्हांकित करुन द्यावा. अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली. या दोन्ही मागण्यां प्रांतांनी स्विकारल्या. ठेकेदाराने छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करुन द्यावे अशी विनंती नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केली. Guhagar Vijapur Highway
पुन्हा मोजणी, पुन्हा अधिसूचनाआजवर झालेल्या रामपूरपर्यंतच्या महामार्गाच्या कामात किती जागा मालकांची जमीन गेली आहे हे तपासण्यासाठी भुमिअभिलेखतर्फे पुन्हा मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर अधिसूचनाही प्रसिध्द केली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण करुन महामार्गात जमीन गेलेल्यांना त्यांचा मोबदला दिला जाईल. अशी माहिती प्रांत प्रविण पवार यांनी दिली.Guhagar Vijapur Highway