• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 November 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली येथे गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शन

by Mayuresh Patnakar
November 23, 2026
in Guhagar
45 1
0
Guhagar Taluka Science Exhibition
89
SHARES
255
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, चिकित्सक विचारशक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक ३, ४ व ५ डिसेंबर २०२६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवली येथे करण्यात येणार आहे. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी पार पाडण्यासाठी गुहागर तालुका विज्ञान मंडळाच्या वतीने विशेष नियोजन सभेचे आयोजन गटशिक्षणाधिकारी श्री आर एच गळवे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथे करण्यात आले होते. Guhagar Taluka Science Exhibition

तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, विज्ञानप्रेमी आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प, प्रतिकृती, संशोधनात्मक उपक्रम आणि नावीन्यपूर्ण संकल्पना यांना विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. Guhagar Taluka Science Exhibition

यावेळी 1.मुख्य सनियंत्रण समिती, २. निमंत्रण समिती, ३. नोंदणी समिती ४. स्वागत समिती, ५. भोजन समिती, ६. वाहतूक व्यवस्थापन समिती, ७. प्रश्नमंच समिती, ८. उद्घाटन व समारोप समिती, ९. प्रमाणपत्र लेखन समिती, १०. प्रसिद्धी व लेखन समिती या समित्यांची स्थापना करण्यात आली. Guhagar Taluka Science Exhibition

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासंदर्भात आपापली मते मांडली. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या माध्यमातून नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुणवत्ता सर्वांसमोर यावी, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची भूमिका व्यक्त केली. तळवली येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार्याने होणारे हे प्रदर्शन गुहागर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याबरोबरच त्यांच्यातील संशोधक, संशोधकवृत्ती आणि नवकल्पनांना प्रोत्साहन मिळणार आहे. Guhagar Taluka Science Exhibition

या नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी  सौ. सारिका शिंदे मॅडम , केंद्रप्रमुख महेंद्र वळवी केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचे मुख्याध्यापक एम. ए. थरकार सर, गुहागर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे मॅडम, गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मंगेश गोरविले, पंचायत समितीचे चपलवार साहेब, गायत्री गनगुटकर मॅडम,  गुहागर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अरविंद पालकर , तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष जी एन पाटीलआदी मान्यवर उपस्थित होते. Guhagar Taluka Science Exhibition

Tags: GuhagarGuhagar NewsGuhagar Taluka Science ExhibitionLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share36SendTweet22
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.