उखडलेली खडी ठरतय धोकादायक
गुहागर, ता. 17 : गुहागर एस. टी. आगारातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे आहे. परंतु आगारातील सर्व दिवे बंद आहेत. तसेच आगारामधील काँक्रीटची वर आलेली खडी वाहनाच्या टायरला लागून उडल्याने प्रवासीवर्गाला दुखापत होऊ शकते, अशी धोकादायक अवस्था निर्माण झाली आहे. तसेच अचानक १५ मिनिट अगोदर एस. टी. फेरीच रद्द करण्याचा प्रकार आगारातून सुरू होता. यामुळे प्रवासीवर्ग संतप्त प्रतिक्रिया देताना दिसून येत होता. Guhagar ST Agar in the dark
गुहागर आगारातील सायंकाळच्या उजेडाचा अजब प्रकार पहावयास मिळत आहे. ज्या प्रवाशांच्या जोरावर आज एस. टी. महामंडळ सुरू आहे. तो प्रवासी मात्र आगारात रात्री ९ वाजेपर्यंत चाचपडताना दिसून येत आहे. आगारातील आवारातील सर्व दिवे बुझलेले आहेत. अशामध्ये आवारामधील काँक्रीटची खडी वर आली असल्याने या काळोखात केव्हा दगड डोक्यात बसेल याची शास्वती देता येत नाही. दिवसभरातही येथील आवारात फिरताना काळजीपुर्वक वर्दळ करावी लागत आहे. गुहागर आगारामधून या सुट्टीच्या कालावधीसाठी मोठया प्रमाणात जादा फेऱ्या लावण्यात आल्या आहेत. परंतु सायंकाळी ६ नंतर आगारातील सर्व अधिकारी आपली डयुटी बजावून घरी जात असल्याने चालक वाहक व कंट्रोलवर सर्व भार पडत आहेत. सायंकाळच्या वेळी नियंत्रक व जबाबदार अधिकारी नसल्याने एकूणच व्यवस्थापन कोलमडलेले दिसून येत आहे. Guhagar ST Agar in the dark
दरम्यान या आगाराच्या काँक्रीटीकरणाचे काम अलोरे येथील आशिष मुहारेकर यांना देण्यात आला असल्याचे आगारप्रमुख सोनाली कांबळे यांनी सांगितले. डिसेंबर २०२३ रोजी मिळालेल्या या काँक्रीटीकरणाच्या ठेकेदाराला मुहूर्त साडत नसून आगारप्रमुखांनी येथील काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सुचना केल्याआहेत. योग्य त्या सुचना ठेकेदाराला दिल्या आहेत. आगारप्रमुख सोनाली कांबळे यांनी जोपर्यंत काँक्रीटीकरण होत नाही. तोपर्यंत येथील लाईटचेही काम होत नाही. जमिनीतून कनेक्शन घेतले जाणार असल्याने काँक्रीटीकरणाबरोबर दिव्यांचे काम होईल असे सांगीतले. निवडणूक व विवाह सोहळा यामुळे एस. टी.वाहने कमी पडत होती. मात्र आता सर्व सुरळीत होणार असल्याचे सांगितले. उन्हाळी सुट्टीमध्ये जादा १५ फेऱ्या केल्या असून यामध्ये भांडुप २, बोरीवली २, विरार ४, धोपावे विरार १, स्वारगेट ३, पंढरपुर १ यांचा सामावेश असल्याची यावेळी माहीती दिली. Guhagar ST Agar in the dark