गुहागर, ता. 07 : वरचापाट येथील श्री पिंपळादेवी मंदिर हे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवानिमित्त श्री पिंपळादेवी क्रीडा मंडळ कडून देवीच्या चरणी चांदीचा अतिशय देखणा मुखवटा अर्पण करण्यात आला आहे. Guhagar Shraddhasthan Sri Pimpladevi
फार वर्षांपूर्वी आत्ताच्या मंदिराच्या जागेवरती अतिशय जुने व प्रचंड विस्तार असलेले एक भले मोठे पिंपळाचे झाड होते. त्याठिकाणी देवीची पूजा श्रद्धेने केली जायची. पण कालांतराने ते पुरातन पिंपळाचे झाड जीर्ण होत गेले. अखेर ते उन्मळून पडले. वृक्षाच्या खाली एक गोलाकार पाषाण सापडले व त्या पाषाणाला देवीयोग म्हणून पिंपळाच्या वृक्षाच्या जागेवरती त्या पाषाणाची स्थापना केली. त्याचे श्री पिंपळादेवी असे नावं पडले. Guhagar Shraddhasthan Sri Pimpladevi

सुरुवातीस एक छोट्या देवळीच्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या मंदिराचे पुढे ग्रामस्थांनी मोठ्या मंदिरात रूपांतर केले. त्यानंतर गावकरी व गावातील तरुण मंडळांनी श्री पिंपळादेवी क्रीडा मंडळ यांनी या मंदिराचे पूर्ण जीर्णोद्धार केले. मंदिरामध्ये दर मंगळवारी आरती केली जाते. तसेच वार्षिक पूजा व नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच मंदिरात पिंपळादेवी महिला मंडळ यांच्या वतीने दरवर्षी हळदीकुंकू समारंभ मकर संक्रांतीच्या दिवशी केला जातो. गुहागर वरचापाट ग्रामस्थांनी मंदिराचे सर्व कार्य पिंपळादेवी मंडळाच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे सर्व कार्य क्रीडा मंडळ मार्फत केले जातात. मंदिरात होणारे कार्यक्रम यामध्ये महिला मंडळाची मोठा सहभाग असतो. तसेच सर्व वरचापाट ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य अविरत चालू आहे. गावातील तरुण मंडळी पिंपळादेवीच्या नावाने क्रीडा मंडळ चालवितात व त्यामध्ये मिळणारे नफ्यातून देवीच्या मंदिरासाठी काही ना काही योगदान हे नेहमीच देत असतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे संगमरवरी सुशोभीकरण देखील पिंपळादेवी क्रीडा मंडळाने केले आहे. Guhagar Shraddhasthan Sri Pimpladevi
