गुहागर, ता. 07 आषाढी एकादशी निमित्त रविवार दि. 10 जुलै रोजी श्री देव व्याडेश्वर देवस्थानचे परशुराम सभागृह, गुहागर येथे संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे श्री देव व्याडेश्वर फंडाच्या वतीने कळविण्यात येत आहे. Guhagar Sangeet Rajni program


श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड यांच्या वतीने कलाप्रेमी ग्रुप रत्नागिरी यांचा संगीत रजनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात अजिंक्य पोंक्षे, अभिजीत भट, करूणा पटवर्धन हे कलाकार गायन सेवा सादर करणार आहेत. त्याला हार्मोनियम साथ वरद सोहनी, पखवाज साथ मंगेश चव्हाण, तबला साथ केदार लिंगायत, अन्य तालवाद्य साथ हरेश केळकर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन पुर्वा पेठे करणार आहेत. Guhagar Sangeet Rajni program


तरी रविवार दि. 10 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता या कार्यक्रमात उपस्थित राहून सर्वांनी गायन कलेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री देव व्याडेश्वर फंडाने केले आहे. Guhagar Sangeet Rajni program

