गुहागर, ता. 23 : गुहागर शहर रिक्षा चालक – मालक संघाने तहसिलदार गुहागर व पोलीस निरीक्षक गुहागर यांना एक दिवसीय संपाचे निवेदन दिले आहे. या संपामध्ये तालुक्यातील इतर रिक्षा संघटनासुध्दा सहभागी होणार आहेत. Guhagar rickshaw driver-owner union strike

गुहागर शहर रिक्षा चालक – मालक संघाने केंद्र शासनाचा नवीन कायदा हिट अँड रन या काळ्या कायद्याला विरोध म्हणून, शहरातील सर्व रिक्षा चालक व मालक हे बुधवार दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी एक दिवस रिक्षा व्यवसाय बंद ठेवून लाक्षणीक संप करणार असल्याचे निवेदन तहसिलदार गुहागर व पोलीस निरीक्षक गुहागर यांना दिले आहे. Guhagar rickshaw driver-owner union strike
