कोकण संघटन समिती अध्यक्ष सूर्यकांत पागडे यांची मुख्यमंत्रांकडे मागणी
गुहागर, ता. 05 : कोकणातील लाखो प्रवासी रोज मिळेल त्या रेल्वेने कोकण मुंबई प्रवास करत असतात. त्याकरीता वेळेवर एस. टी. येत नाही. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने विद्यार्थी तसेच नोकरी व्यवसायाकरिता जाणारी जनता प्रवास करत असते. Guhagar railway to be started
यासाठी पर्यायी प्रवास व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे विस्तारित मार्ग वीर रेल्वे स्टेशन(महाड) ते आंबेत- म्हाप्रल-मंडणगड तालुका- दापोली तालुका ते गुहागर तालुका पर्यंत रेल्वे मार्ग बांधणे व प्रवासाठी कायमस्वरूपी तोड़गा म्हणून कोकण रेल्वे विस्तारित सुरु करण्याशिवाय पर्याय नाही. संपूर्ण कोकण विभाग व्यवसाय, उद्योग, व्यापार विकास, प्रगति व्हावी याकरिता ठोस उपाययोजना करावी. याबाबत आग्रही मागणी कोकण संघटन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री. सुर्यकांत गोविंद पागडे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मांगणी केली आहे. Guhagar railway to be started
