गुहागर चौपाटीसह सर्व पर्यटन स्थळांवर गर्दी; हॉटेल, लॉज व्यावसायिकांची चलती
गुहागर, ता. 21 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असलेल्या गुहागरची ओळख साथसमुद्रापार पोहचली आहे. इथल्या पर्यटन स्थळांबरोबरच पर्यटक आता किनाऱ्यावरील थर्टी फर्स्ट पार्टीसाठी पसंती देत आहेत. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरू लागली आहेत. Guhagar preferred for thirty-first
पर्यटक दरवर्षी गुहागरात वेगवेगळ्या हंगामात मोठी गर्दी करत असतात. पर्यटनासाठी सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गुहागरातील पर्यटनाला गेल्या काही वर्षात सुगीचे दिवस आले आहेत. निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी, प्राचीन मंदिरासह प्रेक्षणिय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठया संख्येने येत असतो. वर्षातून नाताळ सुट्टी व ३१ डिसेंबरला गुहागर पर्यटकांनी फुल्ल होऊन जातो. तर एप्रिल महिन्यात मुलांच्या परिक्षा झाल्यानंतर शाळा महाविद्यालयाच्या सुट्ट्यामुळे व कडाक्याच्या उन्हामुळे मुंबई, पुणे व अन्य ठिकाणचे पर्यटक गुहागरात धाव घेतात. Guhagar preferred for thirty-first

तालुक्यात सुमारे ५६ हॉटेल, ३५ एमटीडीसी निवासस्थाने व ७५ घरगुती निवास आणि राहण्याची यापेक्षाही जास्त व्यवस्था आहे. पूर्वी गृहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक सलग तीन ते चार दिवस वास्तव्य करु लागला आहे. एवढेच नव्हे तर गुहागरात राहून आता गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटन स्थळे पाहून पुन्हा गुहागरात येऊ लागला आहे. ही येथील पर्यटन सोयी सुविधामूळे शक्य झाल्याचे येथील हॉटेल व्यावसायिक श्री. शामकांत खातू सांगतात. त्यांनी सांगितले की, गुहागर हे पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याने कौटुंबिक पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असते. पर्यटनाने येथील जनतेला रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. वाढत्या पर्यटन व्यवसायामुळे चित्रपटांचे चित्रिकरणाचे प्रमाण वाढले आहे. शिवाय स्वच्छ सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे विविध क्षेत्रातील मंडळी भेटी देत असतात. ही वाढत्या गुहागर पर्यटनाची पोच असल्याचे ते म्हणाले. Guhagar preferred for thirty-first
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गुहागर चौपाटीवर समुद्रातील बोटीग, घोडेस्वार, उंट सफरी, खाद्य पदार्थांचे स्टॉल सज्ज झाले आहेत. शिवाय हॉटेल लॉज व घरगुती राहण्याच्या व्यवस्थाहि पर्यटकांच्या स्वागताची तयारी करताना दिसत आहेत. १५ डिसेंबर पासून गुहागर शहर व अन्य देवस्थाने आणि प्रेक्षणीय स्थळे याठिकाणी पर्यटक गर्दीने दिसू लागले आहेत. ३१ डिसेंबरसाठी सर्व हॉटेल, लॉज घरगुती राहण्याची ठिकाणे बहुतांशी फुल्ल होताना दिसत आहे. Guhagar preferred for thirty-first
