गुहागर, ता. 01 : तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या पाच जणांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथील चेक पोस्टवर पोलिसांनी नाकाबंदी केली असताना ही कारवाई करण्यात आली. या संशयीताविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,7, 25, भारतीय दंड संहिता 34 प्रमाणे 135 भारतीय कलम 188 आयपीसी कलम द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Guhagar police action

अभिजीत विजय शेटे (वय 41) राहणार पवार साखरी तालुका गुहागर, सुशील सुधीर पवार (वय 32) राहणार कांदिवली, जोगेश शंकर भुवड (वय 47) राहणार पवार साखरी, सुयोग सुधीर पवार (वय 32) राहणार पवार साखरी यांना शृंगारतळी चेक पोस्ट जवळ त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहन व वाहना मधून बारा बोर बंदूक चार काडतूस, दोन बॅटऱ्यांसह ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा पुढील तपास गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत करीत आहेत. सदर प्रकरणी संशयीतांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे सोप्या पद्धतीने शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. Guhagar police action
