गुहागर पंचायत समिती आमसभा संपन्न
गुहागर, ता. 10 : गुहागर पंचायत समितीची आमसभा आ. भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. या सभेत आ. जाधव यांनी जनतेचे प्रश्न ऐकून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांचे प्रश्न तत्काळ सोडवा, अशा सूचना केल्या. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष आमसभा घेता आली नव्हती. Guhagar Panchayat Samiti General Assembly
भंडारी भवन येथे पार पडलेल्या या आमसभेला तहसीलदार प्रतिभा वराळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषद माजी सदस्य नेत्रा ठाकूर, प्रवीण ओक, पंचायत समिती माजी सदस्य सिताराम ठोंबरे, पांडुरंग कापळे, रवींद्र आंबेकर, पूर्वी निमोणकर, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. लावेकर, माजी सभापती विलास वाघे, पोलीस उपनिरीक्षक पवन कुमार कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, मनसे तालुकाध्यक्ष निलेश हळदणकर, विनोद जानवळकर आदी उपस्थित होते. Guhagar Panchayat Samiti General Assembly
सुरुवातीला दुःखत आणि अभिनंदनाचे ठराव, त्यानंतर शालेय, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या आमसभेत आ. जाधव यांनी रत्नागिरीत शाळा व शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जा युनिटद्वारे वीज वापरली जाणार असल्याची माहिती दिली. या धर्तीवर दुसरे सौर वीज युनिट गुहागरसाठी मंजूर करून घेतली असुन वरवेली येथे हे युनिट होणार आहे. जल जीवन मिशन योजनेबाबत बोलताना आ. जाधव म्हणाले, तालुक्यात 105 योजनांसाठी 175 कोटींचा आराखडा तयार झाला आहे. Guhagar Panchayat Samiti General Assembly
सरकारने तीन दिवसात आराखडा पाठवण्याच्या आदेश दिल्याने कोणालाही विश्वासात न घेता टेबलावर बसून आराखडा तयार केला गेला. कुवत नसलेल्यांना कामे दिल्याने ही योजना यशस्वी होणार नाही या योजनेचा बोजवारा ऊडणार आहे. शासनाकडून नवीन कोणतीही योजना न आणता जुन्या योजनांनाच नवीन नाव देऊन आपणच विकास करत असल्याच्या बोंबाबोंब शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मारल्या जात आहेत. लाभार्थ्यांना कमी श्रम लागावे म्हणून शासनाकडून ऑनलाईन पद्धतीने योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न होत आहे. तालुका पातळीवर मिळणारे दाखले शासन आपल्या दारी कार्यक्रमातून वाटले जात आहेत. हा निव्वळ सरकारचा भंपकपणा आहे. पीएम किसान योजना तसेच पिक विमा योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ, घ्यावा असे आवाहन करत अधिकाऱ्यांकडून या योजनेची माहिती घेतली. Guhagar Panchayat Samiti General Assembly
यावेळी कृषी अधिकारी शिरसागर यांनी तालुक्यात 14000 खातेदार असून 11949 लाभार्थी आहेत. यामध्ये पिक कर्ज घेतलेल्या 2911 खातेदारांमधून नियमित कर्ज भरणाऱ्या 2875 खातेदारांना दोन कोटी तीस लाख रुपये वाटप झाले आहेत. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे 183 जणांना याचा लाभ घेता आला नाही. किनारपट्टी भाग असल्याने लोखंडी वीज खांब सडतात. यामुळे सिमेंट पोल टाकण्याबाबत चर्चा झाली. यावेळी वर्षभरात 2160 सिमेंट पोल दोन टप्प्यात टाकले जाणार आहेत. तसेच भविष्यात भूमिगत पद्धतीने काम होणार असल्याचे माहिती अभियंता लवेकर यांनी दिली. Guhagar Panchayat Samiti General Assembly
वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या शेती नुकसानीचे भरपाई मिळते. मात्र येथील बागातदारांचा झाडावरील मोहर प्राणी किंवा निसर्गामुळे गळून जातो. यालाही नुकसान भरपाई मिळण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे आ. जाधव म्हणाले. तालुक्यातील बचत गटांचे चांगली कामगिरी लक्षात घेऊन बचत गटांसाठी चिपळूण तालुक्यातील कापसाळनंतर दुसरे विक्री केंद्र गुहागरला होणार असल्याचे सांगितले. भुमिअभिलेख अंतर्गत मोजणी अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात असल्याने सामान्य जनतेला त्रास होत आहे. अशावेळी केवळ ऑनलाइन पद्धतीचा गाजावाजा न करता पूर्वीप्रमाणेच अधिकाऱ्यांनी जनतेला मोजणी अर्ज भरून देण्यासाठी सहकार्य करावे असे आ. जाधव यांनी सुनावले. Guhagar Panchayat Samiti General Assembly