घरपट्टी, पाणीपट्टी, वसुली; आरजीपीपीएलच्या थकबाकीचा फटका
गुहागर, ता. 01 : गावातील नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी तसेच इतर घटकांतूनही ग्रामपंचायत कर आकारणी केली जाते. यातूनच गावातील ग्रामपंचायत आपला खर्च भागवते. या अंतर्गत मार्च महिना संपायच्या अगोदर गुहागर पंचायत समितीने याचा आढावा घेतला असता, गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायतींची वसुली फक्त 67 टक्के आढळून आली. आरजीपीपीएलच्या 2 कोटी 21 लाख थकबाकीमुळे जिल्हयात गुहागर बॅक फुटवर आल्याचे समजते. Guhagar on the back foot in the district
एप्रिल 2022 ते मार्च 2023 या 12 महिन्यात गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायतींची आरजीपीपीएल कंपनी वगळता सुमारे 80 टक्के घरपट्टी वसुल केली आहे. आरजीपीपीएलची थकबाकी पकडल्यास ती 67 टक्के होते. म्हणजेच आरजीपीपीएलची पूर्ण वसूली झाली असती तर जिल्हयात गुहागर तालुका आघाडीवर असता. Guhagar on the back foot in the district

रत्नागिरी जिल्हयात 1 जुन 1959 रोजी ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली. जिल्हयातील 9 तालुक्यामध्ये 850 ग्रामपंचायती आहेत. घरपट्टी, पाणीपट्टी, वसुलींकरीता सण 1962 साली ग्रामसचिवांची शासनाने नेमणूक केली. त्यांच्या माध्यमातून महसूल गोळा करणे, सरपंचाना मार्गदर्शन करणे, घरपट्टी व पाणीपट्टीचा महसूल गोळा करणे आदि सर्व कामे केली जावू लागली. Guhagar on the back foot in the district
त्यामुळे ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात कर मिळू लागला. व ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढून गावातील सार्वजनिक विकास कामांसाठी ग्रामपंचायतीकडे स्वत चा निधी तयार होवू लागला. सध्या जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामपंचायती घरपट्टी वसुलीकडे गांभीर्याने लक्ष घालू लागल्या आहेत. Guhagar on the back foot in the district
