गुहागर, ता. 15 : गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष साहिल आरेकर यांच्या नेतृत्वाखाली शृंगारतळी जिल्हा परिषद गटाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होतो. गटातील विकास कामे आणि येणार्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. Guhagar NCP workers’ meeting
खासदार सुनील तटकरे निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामे गुहागर तालुक्यात झाली आहेत. शृंगारतळी जिल्हा परिषद गटात देखील भरपूर कामे झाली असून यावर देखील चर्चा झाली. येणार्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. नेत्यांच्या निवडणुकांमध्ये महायुती होते. मग आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका महायुती म्हणुनच व्हाव्यात, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु उद्या महायुती झाली नाही तरी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही केलेली आहे, असे कार्यकर्त्यांचे भावना आहे. Guhagar NCP workers’ meeting

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर तालुका सेक्रेटरी संतोष जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस तळवली पंचायत समिती गण अध्यक्ष आतिष हातीसकर , राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर तालुका उपाध्यक्ष श्रीधर बागकर, तळवली गावाचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जोशी,पडवे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष तुषार सुर्वे, दीपक शिरधनकर , सुनील मते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. Guhagar NCP workers’ meeting