कार्यकर्ते अस्वस्थ, अनेक महिन्यात वरिष्ठांचा संपर्क नाही
गुहागर, ता. 07 : महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मंत्रालयांशी असलेला संपर्क तुटला. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला उर्जा देण्यासाठी खासदार सुनील तटकरे गुहागरला कधी येतात. याकडे पदाधिकारी, कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत. Guhagar nationalist activists upset

हक्काचा आमदार नसला तरी राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे होत होती. मंत्रालयात राष्ट्रवादीचे मंत्र्यांकडे हक्काने जाता येत होते. मात्र तिन महिन्यांपूर्वी शिंदे सरकार स्थापन झाले आणि राष्ट्रवादीच्या मंत्रालयातील वाटा बंद झाल्या. गुहागरमध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांना नेते म्हणून बढती मिळाल्याने जाधव समर्थक शिवसैनिक आनंदी आहेत. भैय्या सामंत यांनी शिंदे गटाकडे ओढा असलेल्यांना आधार दिला आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्याने या पक्षाचे कार्यकर्तेही उत्साहात आहेत. मात्र राजकीय परिस्थितीने गुहागरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कोंडी केली आहे. खासदार म्हणून निवडून आल्यावर सुनिल तटकरेंनी येथील कार्यकर्त्यांना जवळपास 1 कोटीचा निधी दिला. गुहागरमध्ये येवून पदाधिकारी कार्यकर्त्यांना बळ दिले. मात्र गेल्या आठ महिन्यात खासदार सुनील तटकरे गुहागरला आलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा मरगळ आली आहे. Guhagar nationalist activists upset
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्या आहेत. वर्षभरात गुहागर नगरपंचायतीची निवडणुक आहे. या पार्श्र्वभुमीवर खासदार सुनील तटकरे, पालक आमदार यांनी गुहागरात यावे. संवाद साधावा, निवडणुकीसाठी मार्गदर्शन करावे. पक्षात आलेली मरगळ दूर करुन उर्जा मिळावी. एवढी माफक अपेक्षा कार्यकर्ते बाळगुन आहेत. Guhagar nationalist activists upset

पाच महिन्यांपूर्वीच अशीच अपेक्षा तत्कालीन तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनीही बोलुन दाखविली होती. खासदारांनी निधी दिला पण कामाचे उद्घाटन करायला राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा, प्रदेशचे पदाधिकारी येत नाही. मग पक्षाला उत्साह कसा द्यायचा. असा त्यांचा प्रश्र्न होता. मात्र असे प्रश्र्न उपस्थित केल्याने त्यांना पक्षातूनच टिका सहन करावी लागली. अखेर त्यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पद्माकर आरेकर यांच्या रुपाने ज्येष्ठ, जाणता तालुकाध्यक्ष मिळाला. परंतू आजही परिस्थिती बदललेली नाही. या परिस्थितीची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी केली नाही तर आज तळ्यात मळ्यात असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी अन्य पर्याय शोधतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था 2008 पूर्वीसारखी होईल. अशी भिती दबक्या आवाजात व्यक्त होत आहे. Guhagar nationalist activists upset