• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी पदावर स्वप्निल चव्हाण कायम

by Ganesh Dhanawade
May 22, 2025
in Guhagar
178 2
0
Guhagar Nagar Panchayat Chief Swapnil Chavan
350
SHARES
999
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ठाण्यातील सहाय्यक आयुक्त पद सोडले

गुहागर, ता. 22 : गुहागर नगरपंचायतीवर काही महिन्यापूर्वी थेट नियुक्त झालेले कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून स्वप्नील चव्हाण यांची 22 एप्रिल रोजी ठाणे महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त पदी बदली झाली होती. मात्र सदर महत्त्वाचे पद सोडत तेथे झालेली बदली थांबवून गुहागर मध्ये सुरू केलेल्या नवीन विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी ते पुन्हा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदावर सोमवारपासून रुजू झाले आहेत. Guhagar Nagar Panchayat Chief Swapnil Chavan

गुहागर नगरपंचायतीला 2021 पासून नियमित मुख्याधिकारी नव्हते. यामुळे नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विविध उपक्रम रखडले होते. मात्र गेल्या सहा महिन्यापूर्वी गुहागर नगरपंचायतीवर नव्याने रुजू झालेले स्वप्निल चव्हाण यांनी गुहागर नगरपंचायतीचा कारभार हाती घेतल्यापासून नियमितता आणली होती. गुहागरचा पर्यटन विकास होण्यासाठी ब्ल्यू फ्लॅग सारख्या नवीन उपक्रमाचा शुभारंभ त्यांनी केला होता. शहरात वॉटर एटीएम सुरू करण्याचेही नियोजन झाले असून अंतिम टप्प्यात आहेत. स्वच्छ शहर करण्याकरताचे नियोजन ही सुरू होते. Guhagar Nagar Panchayat Chief Swapnil Chavan

गुहागर शहरात विकासात्मक बदल सुरू असताना 22 एप्रिल 2025 रोजी स्वप्निल चव्हाण यांची थेट ठाणे महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. 22 एप्रिल रोजी गुहागर नगरपंचायतीचा कारभार सोडून ठाणे महानगरपालिकेमध्ये हजर राहण्याचा आदेश आला होता. त्याप्रमाणे स्वप्निल चव्हाण यांनी गुहागर नगरपंचायतीचे मुख्यालय सोडले होते. त्यानंतर त्यांनी गुहागर सारखा भाग विकसित करण्यासाठी आपणाला पुन्हा गुहागर मध्येच कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर या प्रयत्नाला यश आले असून गेल्या 28 दिवसाच्या कालावधीमध्ये ते पुन्हा गुहागर नगरपंचायतीवर मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. गुहागर शहरवासीय यांच्या सहकार्याने अधिकारी व कर्मचारी यांच्या जोरावर गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये नियोजित विकासात्मक बदल करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. Guhagar Nagar Panchayat Chief Swapnil Chavan

Tags: GuhagarGuhagar Nagar Panchayat Chief Swapnil ChavanGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share140SendTweet88
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.