गुहागर, ता. 06 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थां गुहागर मधील प्रवेश प्रक्रिया 3 जून 2024 पासून सुरू करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर 11 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. संकेतस्थळावर प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. प्रवेशासंबंधी माहितीकरिता एम. व्ही. जगताप, शिल्पनिदेशक, मो. नं. 7588138178 यांच्याशी संपर्क साधावा. Guhagar ITI admissions open
व्यवसायाची प्रवेश क्षमता वेल्डर ४०, मेकॅनिक डिझेल ४८, कोपा २४ व सुईंग टेक्नॉलॉजी २० हे एक वर्ष कालावधीचे व्यवसाय असुन यामध्ये सुइंग टेक्नॉलॉजी व वेल्डर या व्यवसायांकरिता शैक्षणिक पात्रता हि दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण आहे. व इतर व्यवसायांकरिता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. दोन वर्ष कालावधी करिता इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) ६०, मेकॅनिक मोटर व्हेईकल २४, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअरकंडिशनर टेक्निशियन २४ व फिटर २० हे दोन वर्षाचे व्यवसाय असुन या व्यवसायाकरिता शैक्षणिक पात्रता हि दहावी उत्तीर्ण अशी आहे. Guhagar ITI admissions open
अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येईल. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येईल. व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार/स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घ्यावेत, असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर यांनी कळविले आहे. Guhagar ITI admissions open