माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा इशारा
गुहागर, ता. 16 : गुहागर हे कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होतं आहे. तालुक्याला लाभलेल्या अथांग समुद्रचौपाटीमुळे आज पर्यटक गुहागरात मोठया संख्येने हजेरी लावत आहे. अशावेळी पर्यटकांना समुद्र चौपाटीवरून बाहेर काढणे हा प्रकार गुहागर पोलिसांनी थांबवावा. सुर्यास्त झाल्यानंतर समुद्राच्या पाण्यात कोणीही जाऊ नये हे योग्य आहे. परंतु वाळूमध्ये थांबण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पर्यटनावर गुहागर तालुक्याची इकॉनॉमी अवलंबून आहे. पुढील सहा महिने पर्यटनासाठी पोषक आहेत. याला पोलिस प्रशासनानेही सहकार्य करणे आवश्यक आहे. पर्यटकांना चौपाटीवरून बाहेर काढणे हे योग्य नाही. अन्यथा वेगळा मार्ग तालुकावासीयांना अवलंबावा लागेल, असा इशारा माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. Guhagar is the tourist hub of Konkan
पत्रकारांशी बोलताना डॉ. नातू म्हणाले, गुहागर अंजनवेल व गुहागर वेलदूर हा मार्ग सार्वजनिक बांधकामाच्या मालकीचा आहे. रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाची जागा वेगळी आहे. त्याला संरक्षण आहे. मग अंजनवेल मुख्य मार्गावर होत असलेले चित्रीकरण रोखण्याचा कंपनीच्या सीआयएसएफला कोणताही अधिकार नाही. हा रस्ता त्यांच्या मालकीचा नाही. यापुढे कोणताही प्रकार सहन केला नाही. सीआयएसएफच्या या कृत्याबाबत डॉ. नातू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुहागरला पर्यटन व त्यादृष्टीने येथील निसर्गसौंदर्यामुळे येत असलेले विविध चित्रपटाचे चित्रीकरण ही जमेची बाजू आहे. गुहागर तालुक्याचे अर्थकारण वाढवीणारे, येथील जनतेला विविध मार्गाने व्यवसायाला चालना देणारे हे उपक्रम कायम व्हावेत. यामुळे याला कोणी विरोध करत असेल तर गुहागरातील जनतेने याला योग्यवेळी उत्तर देऊन या अडथळा आणणाऱ्यांना योग्य जागा दाखविली पाहीजे. Guhagar is the tourist hub of Konkan
नुकतेच गुहागर अंजनवेल या मुख्यमार्गावर अंजनवेल गावाच्या प्रवेशद्वारासमोर एका चित्रपटाचे काही सेकंदाचे चित्रीकरण सुरू झाले होते. तर त्याठिकाणी आरजीपीपीएल कंपनीचे सीआयएसएफने सदर चित्रीकरण रोखले. हे अत्यंत चुकीचे आहे. हा रस्ता सीआयएसएफ किंवा कंपनीच्या मालकीचा नाही. कंपनीच्या आतमधील संरक्षण ही सीआयएसएफची जबाबदारी आहे. बाहेरील मार्गावर त्यांचा कोणताही अधिकारी नाही. असे असताना गुहागरच्या विकासासाठी असलेल्या या चित्रकरणासारख्या उपक्रमाला विरोध करून ते बंद पाडणे यापुढे चालणार नाही. गुहागरातील जनतेने याला उत्तर देण्याची वेळ आली आहे. अशा शब्दात सीआयएसएफच्या या कृत्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनीही पर्यटकांना त्रास देऊ नये, असे नातू यांनी सांगितले. Guhagar is the tourist hub of Konkan