गुहागर, ता. 06 : गुहागर येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. तरी इयत्ता ५ वी ते १० वी व त्यापुढील विद्यार्थ्यानी प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. Guhagar hostel admission process started


सदर छात्रालयात सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यानां प्रवेश दिला जातो. या वसतिगृहात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ५५ विद्यार्थ्यांनां प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामध्ये इतर मागासवर्गीय ६५ टक्के, मागासवर्गीय २० टक्के (अनु.जाती/अनु.जमाती), आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय १५ टक्के, व दिव्यांग ३ टक्के याप्रमाणे अर्ज भरावयाचे आहे. हे प्रवेश अर्ज शाळा/कॉलेज प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वसतिगृहात प्रवेश अर्ज मिळतील याची नोंद घ्यावी. Guhagar hostel admission process started


सदर छात्रालयात विद्यार्थ्यानां भोजन, निवास, कपाट, बिस्तारा, बंकबेड, संगणका बद्दलचे ज्ञान, खेळाचे साहित्य, किरकोळ औषधोउपचार इ. मोफत सोय उपलब्ध करून अभ्यासमय वातावरण व खेळासह अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी गरीब, हुशार विद्यार्थ्यांनी शालेय निकाल लागताच प्रवेश अर्ज घेऊन आपल्या पालकांसमवेत छात्रालयात हजर रहावे. विद्यार्थ्यानी येताना पास झालेल्या परीक्षेचे प्रगती पुस्तक, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, विद्यार्थ्याचे बँक पासबुक, आयकार्ड साईज फोटो, इ. दोन झेरॉक्स प्रति आणणे आवश्यक आहे. Guhagar hostel admission process started
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२०१५३५७९, ८४२१०५७६२५ अथवा संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच stc.guhagar@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधून प्रवेश निश्चित करू शकता. Guhagar hostel admission process started