गुहागर, ता. 17 : शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर यांचे वतीने नूकत्याच तालुकास्तरीय शोध कलारत्नांचा चित्रकला स्पर्धा जीवन शिक्षण शाळा नंबर १ येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. Guhagar High School’s Success in Painting Competition


शोध कलारत्नांचा चित्रकला स्पर्धेमध्ये गट क्रमांक क– इयत्ता सहावी ते आठवी मध्ये कु. सिद्धी विकास जांभरकर द्वितीय, कु. सलोनी प्रदीप मोहिते तृतीय. गट क्रमांक ड– इयत्ता नववी ते बारावी कु. स्नेहा आबा शिंदे. इ. अकरावी सायन्स, तृतीय या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. दीपक कनगुटकर साहेब यांनी पुष्प देऊन अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी मार्गदर्शन सौ पाकळे मॅडम यांचे लाभले. सर्व यशवंतांचे शालेय प्रशासन, मुख्याध्यापक श्री .कांबळे सर यांनी अभिनंदन केले. Guhagar High School’s Success in Painting Competition

