गुहागर, ता. 28 : श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर शाळेतील विद्यार्थ्यांनी 24 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना शिष्यवृत्ती 2023-24 (NMMS) परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये शाळेतील एकूण 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. Guhagar High School Success in NMMS Exam
यामध्ये रेईशा वीरेंद्र चौघुले, आर्या मंदार गोयथळे, वृषभ नरेश दाभोळकर, ओमकार अनंत माने, श्रवण श्रीकांत चव्हाण, वेदश्री विशाल रांजाणे, अनुष्का पंकज देवकर, प्रिया परेश तोडणकर, क्रांती चंद्रकांत साळवी, ईश्वरी संजीव ढेपसे, आदिती दशरथ पवार, साची उदय असगोलकर, निष्ठा विनायक पोळेकर, सानवी संकेत गोयथळे, जिया मंगेश कोलकांड, पलाश उमेश गोवळकर, कुणाल जितेंद्र कदम, श्रद्धा दिनेश खांबे या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन उज्वल यश संपादन केले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक श्री.सुधाकर कांबळे, उपमुख्याध्यापक श्री.कोरके, पर्यवेक्षिका सौ.सुजाता कांबळे मॅडम, पर्यवेक्षक श्री.मधुकर गंगावणे व प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. Guhagar High School Success in NMMS Exam