गुहागर, ता. 27 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी मध्ये निवड व नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. Guhagar High School Students Success in NMMS Examination

सन 2022- 23 मधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा दि. 21 डिसें. 2022 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये विद्यालयातील अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर दि. 27 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत निवड यादी जाहीर झाली. यामध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर स .सू .पाटील विज्ञान श्री. म.ज.भोसले वाणिज्य कै. वि. पवार कला कनिष्ठ महाविद्यालयातील कु. शुभम बाबासाहेब बांगर व कुमारी आर्या राजेश तुळसकर या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. Guhagar High School Students Success in NMMS Examination

उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्याचे गुहागर एज्युकेशन सोसायटी स्कूल कमिटीचे अध्यक्ष दीपक कनगुटकर, पालक शिक्षक संघ, मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. कोरके, पर्यवेक्षिका सौ. सुजाता कांबळे व सर्व शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Guhagar High School Students Success in NMMS Examination