गुहागर, ता. 25 : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 98.70 टक्के लागला आहे. या परिक्षेसाठी एकूण 231 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 228 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. Guhagar High School HSC Result

यावर्षीचा एच. एस. सी. बोर्ड परीक्षेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखांचा निकाल 98.70 टक्के लागला. यामध्ये शास्त्र शाखेचा निकाल 99.5 टक्के लागला असून यामध्ये सिद्धी संदिप मुकनाक (74 टक्के) मिळवून प्रथम आली. व्दितीय श्रृती संतोष लवंदे (70.33 टक्के), तृतीय सदबशा अब्दुल मुजावर (69.67 टक्के) गुण मिळविले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून यामध्ये श्रावणी विवेक कळझुणकर (89.50 टक्के) मिळवून प्रथम आली तर व्दितीय तमसिल सलीम सरनोबद (88.00 टक्के), तृतीय अनिषा संजय कानसरे (82.67 टक्के) गुण मिळविले आहेत.. कला शाखेचा निकाल 93.10 टक्के लागला असून यामध्ये यश धोंडू म्हसकर (83.17 टक्के) मिळवून प्रथम आला. द्वितीय श्रावणी संजय रांजाणे (72.83 टक्के), तृतीय सानिया श्रीधर जोगळे (68.00 टक्के) गुण मिळविले आहेत. Guhagar High School HSC Result
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुहागर एज्युकेशन सोसायटी व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. Guhagar High School HSC Result
