उर्वरित सागरी तालुक्यांना ७०३ कोटींचा निधी; कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना
गुहागर, ता. 29 : अरबी समुद्रात वारंवार घोंगावणाऱ्या चक्रीवादळांच्या तडाख्यापासून कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण योजना आखली आहे. कोकण आपत्ती सौम्यीकरण योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी तब्बल ७०३ कोटी ५७ लाख रुपांच्या महाविकास आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाली आहे. यामध्ये निधीमध्ये गुहागर किनारपट्टीला कोणतेही स्थान नसल्याचे दिसून येत आहे. Guhagar excluded from coastal protection fund
खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या जिल्हा प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे किनारपट्टीवरील गावाचे स्थलांतर, वीज पुरवठा खंडित होणे आणि समुद्राची धूप यांसारख्या गंभीर समस्यांवर आता कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. चक्रीवादळानंतर खांब कोसळल्यामुळे किंवा तारा तुटल्यामुळे संपूर्ण जिल्हा कित्येक दिवस अंधारात बुडतो ही डोकेदुखी कायमची मिटवण्यासाठी महावितरण कंपनीमार्फत रत्नागिरी आणि खेड विभागामध्ये तब्बल ३०० कोटी रुपये खर्चुन भूमिगत विद्युतवाहिन्यांचे जाळे तयार केले जाणार आहे. यामुळे वादळातही वीजपुरवठा अखंड सुरू राहील आणि आपत्कालीन यंत्रणा खंडित होण्यापासून रक्षण होणार आहे. Guhagar excluded from coastal protection fund
जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांची सातत्याने होणारी धूप रोखण्यासाठी पतन विभागामार्फत तब्बल १४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याद्वारे २५ नवीन धूपप्रतिबंधक बंधारे उभारण्यात येणार आहेत. शेतीमध्ये समुद्राचे खारे पाणी शिरू नये आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळावे यासाठी खारभूमी विकास विभागामार्फत १४ कोटी ७९ लाख रुपये खर्चाचे ८ नवीन खार प्रतिबंधक बंधारे बांधले जातील. वादळाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी जिल्ह्यात २४८ कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे २० अत्याधुनिक बहुउद्देशीय निवाराकेंद्रे उभारली जाणार आहेत. Guhagar excluded from coastal protection fund
तालुकावार नियोजित निवारा केंद्रे
• दापोली : ५ निवारा केंद्रे (पतन : ९०.७४ कोटी रु.) • खेड: ५ निवारा केंद्रे (सार्वजनिक बांधकाम १७.५८ कोटी रुपये) • राजापूर : ४ निवारा केंद्रे (सार्वजनिक बांधकाम विभाग : ३५.४६ कोटी रुपये) • रत्नागिरी, संगमेश्वरः रत्नागिरीत ६ आणि संगमेश्वरमध्ये १ अशी एकूण ७ केंद्रे (सार्वजनिक बांधकाम विभाग – १०५ कोटी रुपये) Guhagar excluded from coastal protection fund
