• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नृत्य क्षेत्रात दबदबा निर्माण करणारी अनुजा

by Ganesh Dhanawade
March 8, 2023
in Guhagar
162 2
0
Guhagar dancer Anuja Dixit
319
SHARES
911
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 08 : तालुक्यात नृत्य प्रशिक्षण संस्था स्थापन करून अनुजा दीक्षितने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शालेय जीवनातच नृत्य हेच क्षेत्र निवडून त्या दिशेने केलेला तिचा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. मुंबई, पुण्यात जाऊन अनुजा अधिक प्रसिद्धीच्या झोतात झाली असती, पण तीने तसे न करता आपल्या जन्मभूमीतच नृत्य प्रशिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली. आज तिच्या नृत्य प्रशिक्षण संस्थेत तयार झालेल्या प्रशिक्षिणार्थिंच्या माध्यमातून यू ट्युब चॅनेल चालवत आहे. Guhagar dancer Anuja Dixit

Guhagar dancer Anuja Dixit

वयाच्या पाचव्या वर्षी गुहागर तालुका पत्रकार संघाच्या तालुकास्तरीय रेकॉर्ड स्पर्धेत प्रथम प्रथमच अनुजाने भाग घेतला. आणि तिथून मिळालेल्या उत्तेजनार्थ परितोषिकाने तिचे जीवनच बदलून गेले. गुहागरातील शालेय शिक्षणाबरोबरच मुंबईत शास्त्रोक्त शिक्षण अशी कसरत अनुजाचे आई-वडील करीत होते. सात वर्षाच्या शिक्षणानंतर ती नृत्यविशारद झाली. जोडीला विविध स्पर्धांमधून सहभाग सुरू होता. त्यासाठी गुहागर मधील मानसी बावधनकर आणि चिपळूण मधील प्रज्ञा भागवत, नृत्यालिकाच्या केशूपाल, कार्तिक पाल यांचे मार्गदर्शन मिळत होते. तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धांमधून अनुजाने इतकी पारितोषिके फटकवली की, नृत्य स्पर्धांमध्ये तिच्या नावाचा धबधबा निर्माण झाला. या यशामुळे खुद्द वैशाली सावंत आपल्या कोकण दौऱ्यात अनुजाला सहभागी करून घेतले होते. महाराष्ट्रासह अन्य दोन राज्यातील कला महोत्सवात नृत्य क्षेत्रातील मान्यवरांसोबत अनुजा सहभागी झाली होती. Guhagar dancer Anuja Dixit

Guhagar dancer Anuja Dixit

स्वतःला सिद्ध केल्यानंतर गुहागरमध्ये अनुजाने २०१२ मध्ये नित्यम ॲकॅडमीची स्थापना केली. अनुजा सांगते की, शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईत राहिले असते, तर पैसा, प्रसिद्ध मिळाली असती. पण मला तालुक्यात नृत्य कला पोहोचवण्यासाठी काम करायचे होते. आज पर्यंत कौतुक अनुभवत होते. प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेनंतर संस्था शासनमान्य आहे का, मध्येच शिकवणे सोडून दिले तर काय करणार, अशा अनेक चर्चा बाहेर होत होत्या. पण प्रमाणिकपणे काम करत राहण्याचे ठरविले. सुरुवातीला केवळ ११ विद्यार्थी होते. तीन वर्षानंतर शेकडो विद्यार्थी माझ्या संस्थेत सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांमध्ये सहा वर्षाच्या मुली पासून ३६ वर्षाच्या महिला पर्यंत सर्वांचा समावेश होता. अनुजाने गुहागर, शृंगारतळी, मार्गताम्हाणे, तळवली व दाभोळ येथे प्रशिक्षण वर्ग सुरू केले होते. Guhagar dancer Anuja Dixit

अनुजाची नृत्यम अकॅडमी आयएसओ मानांकित शासन मान्यता नृत्यालिका संस्थेशी जोडली गेली आहे. अनुजाने शासनमान्य परीक्षकाचा दर्जा मिळवला आहे. त्यापुढे तालुक्यातील नृत्य क्षेत्रातील पहिली परीक्षक, नृत्याचे प्रशिक्षण देणारी पहिली युवती अशी ओळख निर्माण केली आहे. २०१९ मध्ये नॅशनल स्पोर्ट डान्स स्पर्धेमध्ये अनुजाने परीक्षक म्हणून काम केले आहे. आज तालुक्यासह विविध ठिकाणी होणाऱ्या नृत्य स्पर्धांमध्ये अनुजाने प्रशिक्षित केलेले प्रशिक्षणार्थी यश संपादन करताना दिसत आहेत. Guhagar dancer Anuja Dixit

Tags: GuhagarGuhagar dancer Anuja DixitGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.