तहसिलदार परिक्षित पाटील यांची माहिती
गुहागर, ता. 13 : गुहागर मतदारसंघात एकूण 2 लाख 40 हजार 588 मतदार आहेत. यापैकी 1 लाख 14 हजार 892 पुरुष तर 1 लाख 25 हजार 696 स्त्री मतदार आहेत. तसेच नवमतदार (18 ते 19 वयोगट) 2 हजार 723, दिव्यांग मतदार 1 हजार 180 व ज्येष्ठ नागरिक (85 वयोगट) 4 हजार 19 इतकी संख्या असल्याची माहिती गुहागरचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी परिक्षित पाटील यांनी दिली. Guhagar Constituency Information
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत 32 – रायगड लोकसभा मतदारसंघासाठी अधिसूचना भारतीय निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी रायगड तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दि. 12 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द केली आहे. याची माहिती तहसिलदार पाटील यांनी दिली. 32 – रायगड मतदारसंघाअंतर्गत 264 क्र. गुहागर मतदारसंघात एकूण 322 पैकी गुहागर तालुक्यात 140, चिपळूण तालुक्यात 92, खेड तालुक्यात 90 मतदान केंद्र आहेत. पूर्ण मतदारसंघात नियुक्त क्षेत्र अधिकारी 55 भरारी पथके 09 एकूण व्हीडीओ सर्वेक्षण पथके 06 एकूण स्थी सर्वेक्षण पथके 09 निवडणुकीच्या विविध कामांसाठी तयार केलेली पथके व नोडल अधिकारी 22 प्रत्यक्षात मतदान घेणाऱ्या मतदान अधिकारी यांची संख्या 1 हजार 416 आहे. यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी नियुक्त केलेले आहेत. यासंदर्भातील पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. दुसरे प्रशिक्षण या महिनाअखेर होणार आहे. Guhagar Constituency Information
गुहागर मतदारसंघातील येण्याच्या प्रमुख मार्गावर आबलोली, धोपावे, खोपी येथे तपासणी नाके आहेत. मतदान 7 मे रोजी सकाळी 7 वाजता सुरु होऊन संध्याकाळी 7 वाजपर्यंत असणार आहे. मतदानापूर्वी ईव्हीएम ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले स्ट्राँग रुम लवेल घरडा इन्स्टिट्यूट येथे आहेत. 19 एप्रिल पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करणे, दि. 20 नामनिर्देशन मागे घेणे व छाननी 22 एप्रिल रोजी होणार आहे. दिव्यांग अधिकारी/कर्मचारी नियुक्त मतदान केंद्र क्रमांक 86 गुहागर देवपाट व महिला अधिकारी/कर्मचारी नियुक्त मतदान केंद्र क्र. 87 गुहागर देवपाट येथे असल्याचे तहसिलदार यांनी सांगितले. Guhagar Constituency Information