गुहागर, ता. 12 : सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या येथील लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागरच्या वतीने गुहागर रंगमंदिर येथे आयोजित केलेल्या किनारा युवा महोत्सवाचे हॉटेल शांताईचे मालक शांताराम खानविलकर यांच्या हस्ते शानदार शुभारंभ करण्यात आले. Guhagar Coastal Youth Festival

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन, नटराज प्रतिमा तसेच गुहागर तालुक्यातील स्व. लोकनेते सदानंद आरेकर, माजी आमदार रामभाऊ बेंडल, कै. अर्जुन सदाशिव भागडे, माजी आमदार श्रीधर तथा तात्यासाहेब नातू या सर्व महान व्यक्तीच्या पुष्पहार अर्पण करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमासाठी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर कार्याध्यक्ष साहिल आरेकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष वरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, गुहागर तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, गुहागर नगरपंचायत माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, श्री दुर्गादेवी देवस्थान अध्यक्ष किरण खरे, शिवतेज फाउंडेशन अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, अमोल गोयथळे, प्रदिप बेंडल, शामकांत खातू, युवा सेनेचे अमरदीप परचुरे, भाजप युवा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संगम मोरे, गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, विष्णू होळब, सुनील वराडकर, हेमचंद्र आरेकर, श्रीधर बागकर, चिपळूण को- ऑपरेटिव बँकेचे संचालक अजय खातू, सुनील गोयथळे, तुषार सुर्वे, सोहम सातार्डेकर, चिवेली सरपंच योगेश शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. Guhagar Coastal Youth Festival

यावेळी प्रतिष्ठान तर्फे युवा गुहागर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर यांना सन्मानपत्र व शाल, पुष्प गुच्छ तर क्रीडाभूषण पुरस्कार खेळाडू योगिता खाडे यांना सन्मान पत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये कन्हैया प्ले स्कूल, गुहागर मधील विद्यार्थ्यांनी आमच्या पप्पांनी गणपती आणला…या गाण्याच्या नृत्याने सुरुवात केली. त्यानंतर विविध डान्स, संकासुर, संगीत मैफिल, बहारदार गाण्यांचा कार्यक्रम त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन सिद्धेश आरेकर व दीपक देवकर यांनी केले. Guhagar Coastal Youth Festival

