लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित दि.१० व ११ फेब्रुवारी रोजी
गुहागर, ता. 04 : सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, कला व क्रीडा यासारख्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित १० व ११ फेब्रुवारी रोजी गुहागर रंग मंदिर येथे गुहागर किनारा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर यांनी दिली. Guhagar Coastal Youth Festival
गुहागर किनारा युवा महोत्सवानिमित्त दि. १० रोजी सायं. ५ वा. गुहागर किनारा युवा महोत्सवाचे उद्घाटन, ६ वा. गुहागर युवा व क्रीडा भूषण पुरस्कार वितरण, ६.३० वा. कन्हैया प्ले स्कूल विद्यार्थ्यांचे नृत्य, सायं. ७ वा. संकासुर, संगीत मैफिल, लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. दि. ११ रोजी दुपारी २ ते सायं. ५ वा. महिलांचे हळदीकुंकू आणि होम मिनिस्टर कार्यक्रम, सायं. ५ ते रात्री १० वा. ग्रुप डान्स स्पर्धा, भव्य लकी ड्रॉ, रात्री १० वा. कोकणी नमन ( संकसुर) सादर होणार आहे. तसेच घेण्यात आलेल्या रील सुपरफास्ट स्पर्धेचा निकाल यावेळी जाहीर करण्यात येणार आहे. रात्री १०. ३० वा. बक्षीस वितरण कार्यक्रमाने किनारा युवा महोत्सवाची सांगता होणार आहे. Guhagar Coastal Youth Festival