सामान्य जनतेला न्याय देण्याची जबाबदारी शहरातील कार्यकर्त्यांचीच; डॉ. विनय नातू
गुहागर, ता. 23 : गुहागर शहरामध्ये सर्व शासकिय निम शासकिय कार्यालये आहेत. मात्र आपण या शासकिय कार्यालयांच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या असलेल्या अडीअडचणी सोडविण्यास आपण कार्यकर्ते म्हणून कमी पडतो. येत्या पुढील काळामध्ये भाजपाची सत्ता पुन्हा येणारच आहे. शहराच्या अडचणी जाणून घ्या त्या सोडविण्यासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करेन, असे आश्वासन गुहागर विधानसभा अध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी शहराच्या बैठकीमध्ये केले. Guhagar City Executive Announced
गुहागर शहराची नव्याने कार्यकारणी निवड बैठक डॉ. विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निर्सग निवास येथे पार पडली. यावेळी तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, कोषाध्यक्ष संतोष मावळंणकर, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, सह आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या शहरकार्यकारणीच्या पदाधिकारी यांना नियुक्त पत्र डॉ. नातू यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले. Guhagar City Executive Announced
यावेळी युवा कार्यकारणीचेही नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच नविन गुहागर शहर कार्यकारणी जाहीरमध्ये शहराध्यक्ष नरेश रामदास पवार, सरचिटणिस संतोष शांताराम सांगळे, उपाध्यक्ष सतिश शिरधनकर, स्वप्निल झगडे, प्रविण साटले, चिटणिस दिपक सांगळे, चंद्रकात बोले, निखिल ओक, प्रसाद जांगळे, कोषाध्यक्ष हेंमत बारटक्के, सोशल मिडिया अमित जोशी, सल्लागार किरण खरे, दशरथ जांगळी, राजू साळवी, अर्जून जांगळी, संजय मालप, अरुण रहाटे, जयंत साटले, दिलीप घाडे, नामदेव रामाणे, अरुण जोशी, प्रशांत कचरेकर, समिर मोरे, श्रध्दा घाडे, सौ. ज्योती परचुरे, समिर बागकर, सौ.स्नेहा परचुरे, अशोक जांगळी, सदस्य दिपाली मोरे, उदय होळंब, समिर साखरकर, समिर नरवणकर, सौ. प्रांजली कचरेकर, भुपाल बोले, विरेश पाडावे. सौ. स्मिता जांगळी, विक्रांत सांगळे, गणेश भिडे, सौ.अमृता जोशी, सौ. राधिका मोरे, सुधिर कदम, प्रथमेश पोमेंडकर, भिमसेन सावंत, सौ. सानिका साळवी, माधुरी रहाटे, मंगेश जोशी, सौ. भाग्यलक्ष्मी कानडे, मंगेश खोत, सौ. प्रणिता साटले, ओंकार घरट, संदेश उदेक, प्रविण जांगळी, तेजस गोयथळे, सौ. मृणाल गोयथळे, नेहा वराडकर यांची नियुक्ती करण्यात आली. Guhagar City Executive Announced
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.नातू पुढे म्हणाले, “शहरातील कुळांचा आणि घरठाणाचा विषय अध्यापही मार्गी लागलेला नाही. गेल्या पाच वर्षापुर्वी शहरातून या विषयांच्या माध्यमातून अनेकांचे विषय मार्गी लागले आहेत. या पुढील काळामध्ये महसुल मंत्र्याकडे पत्र व्यवहार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा. शासकिय कार्यालये गुहागर शहरामध्ये आहेत. सर्व अधिकारीच्या गाठीभेटी घ्या. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका बजावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी शहरवासीयांना केले. Guhagar City Executive Announced
यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी सभेला जमलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून समाधान व्यक्त केले. भविष्यात येण्याच्या गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकिमध्ये सर्वानी एकत्रितपणे निवडणूक लढा दिला. तर नगरपंचायतीवर वर्चस्व राहील असा विश्वास आहे. गेला निवडणुकीमध्ये आपण विद्यमान आमदारांनी शह देण्यासाठी वेगळी समिकरणे केली आता सर्वच कार्यकर्ते पुन्हा पक्षासाठी कार्यरत झाले आहेत. त्यामुळे सर्वांनी संपर्क वाढवा. विविध योजना सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रयन्न करा. तुमच्या सुखदुःखामध्ये आम्ही नेहमीच समवेत असू. येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी शहर म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा. अशी विनंतीही कार्यकर्त्यांना केली. शहराध्यक्ष नरेश पवार यांनी नगरपंचायतीमध्ये भाजपाचाच नगराध्यक्ष असेल यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयन्न करणार असल्याचे सांगितले. Guhagar City Executive Announced