Guhagar Boothwise result
गुहागर, ता. 06 : सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकीय विश्र्लेषक, राजकीय घडामोडींचे अभ्यासक यांना निवडणुकीचा निकाल काय लागला यापेक्षा कोणत्या गावात, जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती गणात कोणाला किती मते मिळाली याची माहिती आवश्यक असते. मात्र ही माहिती सहजपणे उपलब्ध होत नाही. निवडणुक आयोग फॉर्म नं. 20 (बुथनिहाय निकाल) पक्षाच्या कार्यकर्त्यांना देतात. पण त्यात बुथचे नाव नसते. त्यामुळे 35 नंबरचा बुथ म्हणजे कोणता बुथ हे लक्षात येत नाही.
Guhagar Boothwise result
यासर्व गोष्टी लक्षात घेवून गुहागर न्यूजने यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये गुहागर विधानसभा क्षेत्रात कोणत्या बुथवर कोणाला किती मते मिळाली याची आकडेवारी आपल्यासाठी दिली आहे. खालील लिंकवर क्लिक करुन आपण संपूर्ण गुहागर विधानसभेची, तालुकानिहाय, बुथनिहाय आकडेवारी पाहु शकता.
https://docs.google.com/spreadsheets/d/16_n-NJvNKnv1v2cBGzfp620SCawa2GtV/edit#gid=2005850785