भूसंपादनाचेही अर्धवट काम
गुहागर, ता. 12 : गुहागर-विजापूर महामार्गावर गुहागर ते रामपूर पहिला टप्पा ९० टक्के पूर्ण झाला आहे. रामपूर ते उक्ताड हा दुसरा टप्पा असून, सुमारे १४ कि.मी.च्या या मार्गासाठी ७१ कोटी रुपये खर्चाची निविदा राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने काढून नऊ महिन्यांपूर्वीच त्यासाठी ठेकेदारही नियुक्त केला. भूसंपादनाचे अर्धवट काम राहिल्याने कामाला सुरवात झालेली नाही. चार महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून पैसे भरूनही भूमी अभिलेख खात्याकडून जागेची मोजणी अद्याप केलेली नाही. ‘Guhagar-Bijapur’ partial work
गुहागर-विजापूर राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला गेल्यानंतर कराड ते गुहागर या १३८ किमीच्या नव्या महामार्गासाठी कराड ते हेळवाक, हेळवाक ते चिपळूण आणि चिपळूण ते गुहागर असे तीन टप्पे करण्यात आले. त्यातील कराड ते हेळवाक दरम्यानचे काम सुरू झाले तरी चिपळूण गुहागर या ४५ कि. मी. तील महामार्ग रूंदीकरणाचे काम रखडले होते. ‘Guhagar-Bijapur’ partial work
भूसंपादन बाकी वर्षभरापूर्वीच यातील गुहागर ते रामपूर दरम्यानचे दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यातील रामपूर ते मिरजोळी, उक्ताडपर्यंतचा १४ कि. मी. चा रस्ता थांबला आहे. या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला असतानाही रखडलेल्या या रस्त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. रामपूर ते चिपळूण शहरातील उक्ताडपर्यंतच्या सुमारे चौदा कि.मी. अंतरातील रुंदीकरणासह काँक्रिट रत्यासाठी ७१ कोटी रुपये खर्चाची निविदा राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रसिद्ध केली. त्यामध्ये सध्या सात मीटर रुंदीचा असलेला हा रस्ता यापुढे दहा मीटरचा होणार आहे. या रस्त्याची निविदा काढून खेडमधील ठेकेदार कंपनीला हे काम मिळाले आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. कोंढे, रेहेळ वैजी, पाचाड, मालघरसह रामपूर या गावातून गेलेल्या या महामार्गाच्या रूंदीकरणात जागेची मोजणी करायची आहे. त्यासाठी डिसेंबर महिन्यात महामार्ग उपविभागाने तीन लाखांची रक्कम भूमी अभिलेख खात्याकडे भरणा केली. तरीही चार महिन्यात मोजणी झालेली नाही. ‘Guhagar-Bijapur’ partial work