• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर देवपाठ समुद्रकिनारी अवैध वाळू उपसा

by Manoj Bavdhankar
June 22, 2023
in Guhagar
1.2k 12
0
Guhagar beach sand extraction
2.3k
SHARES
6.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वाळू माफियांवर लवकरच कारवाई करावी; ग्रामस्थांची मागणी

गुहागर, ता. 22 : गुहागर देवपाठ स्मशानभूमी येथे रात्रीचा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून या वाळू माफियांवर लवकरच कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याआधी बाग व खालचापाट येथे वाळू उपसा सुरू होता. परंतु ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यामुळे तेथील वाळू उपसा बंद झाला आहे.  त्यांचा मोर्चा आता देवपाठ येथे वळवला आहे. Guhagar beach sand extraction

Guhagar beach sand extraction

गुहागर देवपाठ येथील व्याघ्रंबरी देवळासमोर समुद्रकिनारी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोडवर रात्री  वाळू उपसा सुरू आहे. येथे काळोखात येऊन वाळूच्या पिशव्या भरल्या जातात. ही वाळू चार चाकी गाड्यांमधून नेण्यात येते.  वरचा पाट, बाग येथे मोठ्या प्रमाणात अशाच प्रमाणे वाळू उपसा होत आहे. वाळू मोठ्या प्रमाणात काढल्याने तिथे खड्डे पडले आहेत. त्या खडयात पाणी भरत असल्याने किनारा शिल्लक राहिलेला नाही. तसेच पाण्याचा प्रवाह ही बदललेला आहे. Guhagar beach sand extraction

यामुळे येथील वाळू उपसा वेळीच थांबवला नाही. तर भरतीच्या वेळी वाळूसाठी पाडलेल्या खड्ड्यात पाणी भरले तर भविष्यात गुहागर जनतेला, पर्यटकांना फिरायला किनाराच राहणार नाही. यामुळे येथील वाळू करणार्‍या विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. Guhagar beach sand extraction

Tags: GuhagarGuhagar BeachGuhagar beach sand extractionGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्यागुहागर समुद्रकिनाराटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share923SendTweet577
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.