गुहागर समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम, मानवी साखळी ठरली वैशिष्टपूर्ण
गुहागर, ता. 17 : राष्ट्रगीत, प्लास्टीकमुक्तीची प्रतिज्ञा झाल्यावर 646 विद्यार्थी व नागरिकांनी 2.5 कि.मी.ची मानवी साखळी करुन पंचमहाभुते शांती पाठाने सागराला मानवंदना दिली. त्यानंतर गुहागरचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला. तालुक्यातही पंचायत समिती, सागरी सीमा मंच, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 5 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहिम पार पडली. Guhagar beach cleaning campaign

आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिवस आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त भारतातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर एकाच वेळी स्वच्छता मोहिम राबविण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. या निर्णयाप्रमाणे गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या नेतृत्त्वाखाली गुहागर समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी 9 ते 11.30 या कालावधीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये 10 संस्था, खातू मसाले उद्योग व आरजीपीपीएल हे 2 उद्योग, गुहागर शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालय व शृंगारतळीतील रिगल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, श्री देव गोपाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थी आणि शिक्षक, तहसीलदार कार्यालय, सावर्जनिक बांधकाम उपविभाग, एस. टी. महामंडळ, कृषी, सागरी सुरक्षा दल, पोलीस, महावितरण, पंचायत समिती आदी शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, सर्व राजकीय पक्ष या मोहिमेत सहभागी झाले होते. 432 विद्यार्थी व 214 नागरिक, अधिकारी कर्मचारी असे 646 व्यक्ती समुद्रावर उपस्थित होत्या. Guhagar beach cleaning campaign

स्वच्छता मोहिमेच्या सुरवातीला शामकांत खातू व संतोष वरंडे यांनी उपस्थितांच्या वतीने गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल आणि तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांचे स्वागत केले. सामुहिक राष्ट्रगिताने झाल्यावर तहसीलदार सौ. वराळे यांनी मोहिमेची माहिती दिली. त्यानंतर उपस्थित 646 जणांनी समुद्रकिनाऱ्यावर 2.5 कि.मी. पेक्षा जास्त अंतराची मानवी साखळी बनवली. सोहोनी गुरुजी आणि त्यांच्या सहकार्ऱ्यानी पंचमहाभुतांची प्रार्थना म्हटली. त्यानंतर सर्वांनी 2.5 कि.मी.चा समुद्रकिनारा स्वच्छ केला. Guhagar beach cleaning campaign

समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी आवश्यक पाणी, व अभियानानंतर कचरा उचलण्याची व्यवस्था गुहागर नगरपंचायतीने केली. कचरा उचलण्यासाठी आवश्यक पिशव्या व हातमोचे आरजीपीपीएलने दिले होते.अभियान संपल्यावर सर्वांना अल्पोपाहाराची व्यवस्था लायन्स क्लब गुहागर, सागरी सीमा मंच आणि आरजीपीपीएलने केली होती. Guhagar beach cleaning campaign

या अभियानामध्ये तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष राजेश बेंडल, गुहागर नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह सागरी सीमा मंच, श्री व्याडेश्र्वर देवस्थान, श्री कोपरी नारायण देवस्थान, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय, लायन्स क्लब, जीवनश्री प्रतिष्ठान, शिवतेज फाऊंडेशन, राष्ट्रीय सरपंच संसद, गुहागर तालुका पत्रकार संघ, वेद पाठ शाळा या संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. Guhagar beach cleaning campaign

