रामदास कदम यांच्या दौऱ्याची अनेकांना प्रतिक्षा
गुहागर, ता. 29 : शिवसेनेला (ठाकरे गट) प्रतिज्ञापत्र देणारे गुहागरमधील काही पदाधिकारी आता शिंदे गटात सामिल झाले आहेत. गुहागरमधुन शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मुंबईत जाण्याचे नियोजनही सुरु झाले आहे. या घडामोडी भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली घडत आहेत. दरम्यान नवरात्र उत्सवात शिंदे गटाचे नेते रामदास कदम देखील गुहागरमध्ये येणार आहेत. त्यामुळे गुहागरमधील शिंदे गटाच्या हालचाली वेग आला आहे. Guhagar await Ramdas Kadam’s visit
गुहागर तालुक्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून शिवसेनेत असलेल्या पदाधिकारी, शिवसैनिकांचा कल शिंदे गटाकडे आहे. याची सुरवात शृंगारतळीमधील काही शिवसैनिकांनी गणपती उत्सवात केली होती. शिंदे गटातील उद्योगमंत्री उदय सामंत गुहागरमध्ये अशासकीय दौऱ्यावर येवून गेल्यानंतर या घडामोडींना वेग आला. नवरात्र उत्सव सुरु होण्यापूर्वी गुहागर तालुक्यातील काही शिवसैनिकांनी रत्नागिरीत जावून भैय्या सामंत यांची भेट घेतली. त्यानंतर सोमवारी खेडचे शशिकांत चव्हाण यांच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील 5 पदाधिकारी, 2 सरपंच भैया सामंताना भेटले आणि शिंदे गटात सामील झाले. यामध्ये गुहागर तालुका कार्यकारीणी सदस्य रोहन भोसले युवासेना तालुकाप्रमुख अमरदीप परचुरे, युवासेना उपतालुकाप्रमुख मुन्ना तावडे, युवासेना उपतालुकाप्रमुख सुमेध सुर्वे, युवासेना शाखाप्रमुख आबलोली सागर काजरोळकर या पदाधिकाऱ्यांसह माजी विभागप्रमुख व मुंढरचे सरपंच सुशील उर्फ बबलू आग्रे, मासूचे सरपंच प्रकाश भोजने उपस्थित होते. Guhagar await Ramdas Kadam’s visit
विशेष म्हणजे या 7 जणांपैकी 5 पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यापूर्वीही शिंदे गटात गेलेल्यांमधील 3 पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दिली असल्याचे समजते. अजुनही प्रतिज्ञापत्र देणारे अनेक पदाधिकारी, शिवसेनेचे सरपंच, माजी पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात जाणार असे खात्रीलायक वृत्त आहे. Guhagar await Ramdas Kadam’s visit
सध्या गुहागरमधुन शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी नियोजन सुरु झाले आहे. शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर संख्या निश्चित करण्याचे काम देण्यात आले आहे. सुमारे 100 पर्यंतची संख्या निश्चित झाली असून आणखी 100 संख्येची तयारी सुरु आहे. Guhagar await Ramdas Kadam’s visit
गुहागरमधील शिंदे गट मजबुत करण्यासाठी शिंदे गटाचे नेते रामदास कदम नवरात्र उत्सवात गुहागरमध्ये येणार अशी चर्चा आहे. त्यांना मानणारा मोठा गट गुहागर शिवसेनेत आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर हा गट सक्रीय राजकारणापासून दूर राहीला होता. रामदास कदम सक्रीय झाल्यानंतर या गटाने त्यांना निमंत्रण दिले आहे. त्यामुळे रामदास कदम आल्यानंतर येथील शिंदे गटात सामिल होणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. Guhagar await Ramdas Kadam’s visit