भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे
गुहागर, ता. 12 : 264 गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार हा विधानसभा क्षेत्रातीलच असावा. गुहागर विधानसभा मतदारसंघात पूर्ण गुहागर तालुका, चिपळूण तालुक्यातील 92 मतदान केंद्र आणि खेड तालुक्यातील 90 मतदान केंद्र असे मिळून विधानसभा क्षेत्र तयार होते. या मतदार क्षेत्रातीलच महायुतीचा उमेदवार असावा असे स्पष्ट प्रतिपादन श्री निलेश सुर्वे तालुका अध्यक्ष गुहागर भाजपा, जिल्हा नियोजन समिती सदस्य यांनी गुहागर येथे केले आहे. Guhagar assembly polls
मागील 15 वर्षात विजयी आणि पराभूत उमेदवारांचे अनुभव लक्षात घेता गुहागर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व हे या विधानसभा क्षेत्रातच अधिवास असणारे असावे म्हणजे या विधानसभा क्षेत्रातील 322 मतदान केंद्र, त्यामधील महसूल गावे, त्या अंतर्गत येणाऱ्या वाडी-वस्त्या यांचा विकास, त्यांच्या मुलभूत गरजा, तेथील समस्या, उद्योग व्यवसाय याची स्थानिक माणसाला चांगली जाण असते आणि यामुळेच होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून जे कोणी प्रतिनिधित्व या मतदारसंघात करणार असतील ते व्यक्तिमत्व या विधानसभा क्षेत्रातीलच रहिवासी असले पाहिजेत असे स्पष्ट मत गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी व्यक्त केले आहे. Guhagar assembly polls