• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्रीकांत शिंदेचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार

by Ganesh Dhanawade
October 2, 2024
in Politics
265 2
1
520
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विधानसभेला विपुल कदम विरुद्ध भास्कर जाधवांचा सामना रंगणार

गुहागर, ता. 02 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यापैकी गुहागर विधानसभा मतदार संघ हा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदु झाला आहे. कारण, गुहागरमधून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांनी उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. Guhagar Assembly Elections

गुहागर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी रविवारी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते. यावेळी गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. शिंदे गटाकडून पितृपक्ष संपल्यानंतर विपुल कदम यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही बातमी बाहेर येताच विपुल कदम हे कामाला लागल्याचे दिसत आहे. कारण, विपुल कदम यांच्याकडून गुहागरमध्ये धर्मवीर- २ या चित्रपटाचे मोफत खेळ आयोजित करण्यात आले आहेत. विपुल कदम यांच्याकडून शहरात याचे फलक लावून जोरदार जाहिरातबाजी केली जात आहे. यानिमित्ताने विपुल कदम हे गुहागरमध्ये पूर्णपणे सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. Guhagar Assembly Elections

गुहागरमधील शृंगारतळी या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी असलेल्या थिएटरमध्ये धर्मवीर चित्रपटाचे स्क्रीनिंग होणार आहे. नाक्या-नाक्यावरती विपुल कदम यांचे बॅनर गुहागरमध्ये राजकीय चर्चेचा विषय झाला आहे. हा सगळा माहौल पाहता गुहागर विधानसभा मतदारसंघातील विपुल कदम यांची राजकीय एन्ट्री निश्चित मानली जात आहे. ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाने विपुल कदम यांना रिंगणात उतरवल्यास विधानसभा निवडणुकीत त्यांना भास्कर जाधव यांच्याशी दोन हात करावे लागतील. विपुल कदम यांच्या पाठीशी श्रीकांत शिंदे यांची संपूर्ण ताकद उभी राहणार असली तरी भास्कर जाधव यांच्यासारख्या आक्रमक नेत्याचा सामना करताना विपुल कदम यांचा कस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विपुल कदम हे भास्कर जाधव यांचा सामना कसा करणार, हे पाहाणे आगामी काळात औत्स्युकाचे ठरेल. मात्र, या मतदार संघातून भाजपचे विनय नातू इच्छुक आहेत. Guhagar Assembly Elections

Tags: GuhagarGuhagar Assembly ElectionsGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share208SendTweet130
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.