आरपीआय उमेदवार संदेश मोहिते; पक्षाची अस्मिता अबाधित राखणार!
रत्नागिरी, ता. 31 : आजवर कोकणाकडे, त्याच्या विकासाकडे सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष केले. त्यामुळे कोकणाचा हवा तसा विकास होऊ शकला नाही. म्हणून कोकणाच्या सर्वंकष विकासासाठी, त्याच्या प्रश्नांना मुख्य अजेंड्यावर आणण्यासाठी आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून गुहागर विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. गुहागरच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून जनतेने आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संदेश दयानंद मोहिते यांनी येथे केले. Guhagar Assembly Constituency
राज्याच्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे. कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) या पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व चिपळूणचे सुपुत्र एडवोकेट दयानंद मोहिते यांचे कनिष्ठ चिरंजीव संदेश दयानंद मोहिते हे गुहागरमधून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. महायुतीमध्ये आपल्या पक्षाला ही जागा सोडावी, असा त्यांनी आग्रह धरला असून काही झाले, तरी आपण ही निवडणूक लढवणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मोहिते यांच्या कुटुंबातील चौथी पिढी रिपब्लिकन चळवळीच्या राजकारणात सक्रिय होत आहे, असे म्हणावे लागेल. Guhagar Assembly Constituency
विधानसभेच्या निवडणुकी विषयी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश युवकचे अध्यक्ष सचिनभाई दयानंद मोहिते यांनी सांगितले की, आंबेडकरी चळवळीत आमच्या कुटुंबाने स्वतःला झोकुन देऊन काम केले आहे. आमच्या पणजोबांपासून सातत्याने आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ राहून आम्ही काम करीत आहोत. आमचे आजोबा भागुराम मोहिते, आमचे वडील एडवोकेट दयानंद मोहिते आणि आता आमची पिढी रिपब्लिकन पक्षाशी एकनिष्ठ राहून आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे काम करीत आहे. रिपब्लिकन राजकारण योग्य प्रकारे उभे राहावे, पक्षाचे अस्मिता आणि अस्तित्व टिकून राहावे , यासाठी आम्ही गुहागर मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहोत. समाजाने तसेच पक्षानेही आम्हाला सहकार्याचा हात पुढे केला आहे असे सांगितले. Guhagar Assembly Constituency


कोकणच्या विकासाच्या बाबतीत अनेक प्रकारे राजकीय पक्ष आश्वासने देतात. चर्चा घडवतात. मात्र प्रत्यक्षात कोणतीच कृती होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा कोकण प्रदेश हा विकासापासून वंचित राहिला आहे. कोकणामध्ये प्रामुख्याने विकास करायचा असेल तर पर्यटन आणि फलोत्पादन, फलोद्यान या विषयांना प्राधान्य द्यावे लागेल . त्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीने एक विजन निर्माण करण्यात आले आहे. आम्हाला जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली तर निश्चितपणे गुहागर सारखा समुद्रकिनाऱ्याने सुसंपन्न असलेला तालुका एक विकसित तालुका घडवण्यावर आमचा भर असेल. या तालुक्याला पायाभूत सुविधा, औद्योगिक वसाहती, वेगवेगळे उद्योगधंदे एनरोन सारखे प्रकल्प जे पर्यावरणाशी सुसंगत असतील असे आणून या तालुक्याचा संपूर्णतः कायापालट करण्याची भूमिका आमची तथा आमच्या पक्षाची असल्याचे नमूद केले. Guhagar Assembly Constituency
आजवर ज्या प्रश्नांना , समस्यांना प्रस्थापित राजकीय पक्षांनी वाचा फोडली नाही, अशा प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून करणार असून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार रामदासजी आठवले यांचे प्रचंड मोठे पाठबळ आपल्याला मिळणार आहे. केंद्रात असलेल्या सत्तेचा उपयोग करून वेगवेगळे उद्योग व्यवसाय आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक पथदर्शी प्रकल्प हाती घेणार आहोत, असे सचिन मोहिते यांनी सांगितले. Guhagar Assembly Constituency
आरपीआयचे उमेदवार संदेश मोहिते यांनी ही निवडणूक गुहागरच्या अस्मितेची आणि विकासाच्या मुद्द्याची असल्याचे सांगून आपल्याला समाजातील सर्व समाज घटकांचा सर्व जाती धर्मातल्या लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचे नमूद केले. कुणाचेही घराणेशाही आम्हाला नको आहे, असे सर्वसामान्य माणसे मत व्यक्त करीत आहेत. ही माणसे आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहण्याचा निर्धार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आम्हाला चांगले बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या उमेदवारीला आंबेडकरी चळवळीतील इतर अनेक सामाजिक धार्मिक संघटना तसेच अनेक राजकीय पक्ष सहकार्य करण्याच्या मानसिकतेत आहेत. लवकरच काही घटक पक्ष अधिकृतपणे जाहीर पाठिंबा व्यक्त करण्याची शक्यता आहे. आणि एक चांगला मेसेज कोकणातील जनतेला यातून मिळू शकेल असे संदेश मोहिते यांनी सांगितले. त्यांच्या उमेदवारीने प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर एक आव्हान उभे करण्याचा प्रयत्न मात्र या निमित्ताने झालेला आहे. Guhagar Assembly Constituency