पेवे खरेकोंड गावाला पालकमंत्र्याची 25 लाखांची भेट
गुहागर, ता. 23 : वारकरी परंपरेचा वारसा असलेल्या पेवे खरेकोंड गावाच्या सर्वांगिण विकासासाठी मी २५ लाख रु. निधी देतो. नागरिकांनी विकासकामांची यादी तयार करा. ४८ तासात कामांना मंजुरी देतो. असे आश्वासन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामस्थांना दिले. ते पेवे खरेकोंड येथील हनुमान मंदीर जीर्णोध्दार सोहळ्यात बोलत होते. Guardian Minister visited Peve Kharekond village
मुंबई महानगरपालीकेतील वरळीचे नगरसेवक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी दत्ता नरवणकर यांचे गाव पेवे खरेकोंड. त्यांच्या आग्रहाखातर पालकमंत्री उदय सामंत पेवे खरेकोंड येथील हनुमान मंदिरात आले होते. ग्रामस्थांतर्फे हनुमान मंदिरात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री सामंत यांनी राजकीय चिमटे काढत, युतीच्या उमेदवारी विषय भाष्य करत, वेगवान निर्णय गतीमान सरकारची दिशा सांगत चौफेर फटकेबाजी केली. Guardian Minister visited Peve Kharekond village


मंत्री सामंत म्हणाले की, राज्यातील युतीचे सरकार देवदेवतांच्या मंदिरासाठी, विकास कामांसाठी मदत करत आहे. राज्यातील ५१ मंदीरासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी दिला. पेवे खरेकोंड मध्ये वारकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वजण पंढरपुरला वारीला जाता. शिंदे फडणवीस सरकारने पंढरपुर तिर्थक्षेत्राचा वाराणसीपेक्षाही सुंदर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. Guardian Minister visited Peve Kharekond village
महाराष्ट्रातील गावांचा विकासही करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी 25 लाखांचा निधी देतो. ग्रामस्थांनी संघटीत होवून, मानसिकता बदलुन विकासकामांचे प्रस्ताव पाठवावेत. 48 तासांत मंजुरी देईन. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. परंतु महिलांच्या आर्थिक उन्नतीचा जीर्णोद्धार होणे तेवढेच गरजेचे आहे. येथे महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र हवे असल्यास तेही मी देण्यास तयार आहे.
मतांसाठी राजकारण, दादागिरी करणे माझ्या स्वभावात नाही. गेल्या अडीच वर्षात काय झाले हे बोलून उपयोग नाही. हनुमंतावर प्रेम करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकणारे कुठच्या पक्षाचे आहेत. याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. Guardian Minister visited Peve Kharekond village


राजकारणात जे जास्त बोलतात. त्यांच्यावरच लोक विश्वास ठेवतात. कमी बोलणाऱ्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. याचा अभ्यास करा. माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या मनात असलेली इच्छा आपल्याला पुर्ण करावयाची आहे, त्याची सुरुवातही आजपासून झाली आहे. आता नक्कीच गुहागरच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. यावेळी पेवे खरेकोंड येथील जय हनुमान ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ, श्री झोलाईदेवी ग्रामविकास मंडळ, श्रीदेव मारुती मंदीर ट्रस्ट, श्री देव मारुती मंदीर कलशारोहण समिती व ग्रामपंचायत पेवे यांच्या वतीने उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. Guardian Minister visited Peve Kharekond village
या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. विनय नातू, मुंबई वरळी प्रभाग क्र.१९७ चे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, पेवे ग्रा.प. सरपंच भारती सावरटकर, उद्योजक विशाल परब, अँड. सुरेश सबरद, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के, तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, तहसिलदार प्रतिभा वराळे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, उपअभियंता सलोनी निकम, रघुनाथ साळवी, भागोजी सावरटकर, ह.भ.प. वसंत सावरटकर, विलास साळवी, नामदेव सावरटकर, प्रविण हरचिलकर, शांताराम टेरवकर, ह.भ.प. सचिन साळवी, वासुदेव साळवी, सिताराम टेरवकर, रामचंद्र टेरवकर, रमेश महाडीक आदी मान्यवरांसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक, पेवे खरेकोंड गावातील ग्रामस्थ व मुंबई येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन साळवी यांनी केले. Guardian Minister visited Peve Kharekond village