BA, B.com, B.sc पदवी परीक्षा 2022 सर्टिफिकेटबाबत
गुहागर, ता. 09 : मार्च- एप्रिल 2022 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी BA, B.com, B.sc पदवी परीक्षा दिली आहे. परंतु ज्यांना अजून पदवी सर्टिफिकेट मिळाले नाही, अश्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही विद्यार्थ्यांनी यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष व लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. साहिल प्रदीप आरेकर यांच्याकडे समस्या मांडली. त्यानंतर श्री. साहिल आरेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री. उदय सामंत यांच्या कानावर ही विद्यार्थ्यांची समस्या घातली. त्यांनी लगेचच दखल घेऊन तात्काळ कार्यवाही केली आहे. Guardian Minister took note of Arekar’s demand

2022 मार्च – एप्रिल मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आले तरी पदवी सर्टिफिकेट मिळाले नाही. अश्या विद्यार्थ्यांना उद्या शुक्रवार दि.१० मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता रत्नागिरी येथील मुबंई युनिव्हर्सिटी रत्नागिरी ऑफिसला बोलावले आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. अधिक महितीसाठी संपर्क : 9545471234 / 9960699526 Guardian Minister took note of Arekar’s demand
