तालुकाध्यक्ष कनगुटकर यांनी आ. जाधवांवर व्यक्त केली नाराजी
गुहागर, ता. 08 : राज्याच्या नगरोत्थान योजनेतून गुहागर नगरपंचायतीला पालकमंत्री उदय सामंत यांनी १ कोटीचा निधी दिला आहे. तर गुहागर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी ५ कोटी निधी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर केला असून आणखी ५ कोटीचा निधी गुहागर तालुक्याला देणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर यांनी दिली. यावेळी त्यांनी आ. भास्कर जाधव यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. Guardian Minister gave funds to Guhagar Constituency
गुहागर तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाल्यानंतर मंगळवारी तालुक्यातील शृंगारतळी येथे पक्षाची पहिलीच पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पक्षाच्या आगामी वाटचालीची माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ९ फेब्रुवारीला वाढदिवस असून त्यानिमित्त गुहागर रंगमंदिर येथे करीयर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. Guardian Minister gave funds to Guhagar Constituency
आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्याकडे एकनिष्ठ राहूनही कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील लोकांना कामे दिली गेली. आमच्या कार्यकर्त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आम्हाला लोकांना रोषाला सामोरे जावे लागते. तालुक्यात रोजगाराचा प्रश्न अजूनही भेडसावत आहे. तालुक्यातील अनेक रस्ते झालेले नाहीत. लोकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. आ. जाधवांनी नेमक्याच कार्यकर्त्यांना जवळ करुन इतरांकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाने प्रभावीत होऊन बाळासाहेबांच्या सेनेत प्रवेश केल्याचे तालुकाध्यक्ष दिपक कनगुटकर यांनी सांगितले. Guardian Minister gave funds to Guhagar Constituency
गुहागर विधानसभा मतदार संघातून आगामी उमेदवारीसाठी सहदेव बेटकर यांचे नाव जाहीर झाले, याबाबत पत्रकारांनी विचारले असता कनगुटकर म्हणाले, बेटकर हे सध्या पक्षाचे नेते रामदासभाई कदम यांच्या खेड दौऱ्यात आहेत. गुहागर तालुक्यात त्यांचा दौरा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. तालुक्यात संघटना बळकट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. येत्या काळात अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असे कनगुटकर यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक प्रल्हाद विचारे, अमरदीप परचुरे, संतोष आग्रे, सुशील अवेरे, नारायण गुरव आदी उपस्थित होते. Guardian Minister gave funds to Guhagar Constituency