कामबंद आंदोलन मागे; ठेकेदाराकडून 3 महिन्यांचे वेतन रखडले
गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्ह्यातील 67 जिल्हापरिषद प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १०२ रुग्णवाहिकाद्वारे 24 तास सेवा देणाऱ्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे वेतन गेले 3 महिने थकले आहे. जीएसटी रक्कमेवरुन हा वाद होवून ठेकेदाराने वेतन देण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हापरिषद आरोग्य विभागाने ठेकेदाराचा ठेका रद्द केला आहे. त्यामुळे 3 महिने वेतन रखडलेल्या चालकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वेतनाची हमी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. Guarantee of Ambulance Drivers Salary by CEO
रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी रुग्णवाहिका सेवेचा ठेका विनसोल सोल्युशन प्रा.लि. पुणे या कंपनीला १३ मार्च २०२४ पासून देण्यात आला होता. मात्र, एकूण रकमेवरील जीएसटी रक्कम न दिल्याने त्याने ठेका घेण्यास नकार दिला. ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आल्याने जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांचे वेतन गेले 3 महिने रखडले आहे. आता नव्याने ठेका निविदा काढण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालकांचे वेतन ठप्प झाल्याने याविरोधात सर्व रुग्णवाहिका चालकांनी १० जूनपासून रुग्णवाहिका सेवा बंद करण्यात इशारा होता. अखेर सीईओंनी हमी दिल्याने हे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. Guarantee of Ambulance Drivers Salary by CEO