वरवेली मराठवाडीतील सचिन विचारे यांची सुकन्या
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील रहिवाशी परंतु सध्या मुंबई येथे वास्तव्य असणारे सचिन गंगाधर विचारे यांची सुकन्या कु. गृहिता ( वय वर्षे ८ ) हिने माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठले. जगातील सर्वात उंच, कठीणात कठीण ट्रेक या छोट्या महाराष्ट्राच्या हिरकणीने २८ ऑक्टोबर रोजी सहज शक्य केलं. या कामगिरीबद्दल कु. गृहिता हिच्यावर गुहागर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. Gruhita reached Mount Everest Base Camp

माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठताना आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जी आव्हाने तिच्या समोर होती. ती म्हणजे, सरळ चढ असलेली शिखरं सर करणे, उणे अंश तापमानाशी झुंझ, थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठेही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आणि आव्हानात्मक हवामानातील बदलांना तोंड द्यावे लागले. अश्यावेळी भल्याभल्यांना देखील घाम फुटतो. पण कु. गृहिता विचारे ती एक प्रकारची हाव चढतच होती. काहीही झालं तरी ते उंच टोक गाठायचं म्हणजे गाठायचच अशी जिद्द उराशी बाळगून आपले वडील सचिन विचारे यांच्या सोबत ती उंची गाठण्यात यश संपादन केलं. Gruhita reached Mount Everest Base Camp
१३ दिवसांचा हा ट्रेक, जो काठमांडूपासून (समुद्र सपाटीपासून १४०० मीटर उंच) रामेछाप विमानतळापर्यंत ४ तासांचा आहे. रामेछाप ते लुक्ला विमानाने प्रवास (समुद्र सपाटीपासून २८४३मीटर उंचीवर). वास्तविक हा ट्रेक १४८ किमीचा आहे. आणि लुक्ला (समुद्र सपाटीपासून २८४३ मीटर उंच) ते फाकडिंग (२६१० मीटर उंच) ते नामचे बाजार (३४४० मीटर) ते टिंगबोचे (३८६० मीटर) ते डिंगबोचे (४४१० मीटर) ते लोबुचे (४९१० मीटर) ते गोरक्षेप (५१४० मीटर) ते कालापथर (५५५० मीटर) आणि अखेरीस मानाचा तुरा म्हणजेच एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर). Gruhita reached Mount Everest Base Camp

हरिता सुद्धा ट्रेकचा एक भाग होती. पण टिंगबोचे (३८६० मीटर) च्या पुढे जाऊ शकली नाही. कारण तिला जास्त उंचीच्या आजाराचा सामना करावा लागला आणि पुढील औषधांसाठी तिला कमी उंचीवरुन परत जावे लागले. आता ती पूर्णपणे बरी आहे. Gruhita reached Mount Everest Base Camp
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवरायांच्या आशिर्वादाने सचिन विचारे आणि त्यांची सुकन्या कु. गृहिता माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प वर पोहोचले. आणि आता लुक्लाकडे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. Gruhita reached Mount Everest Base Camp
