संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 07 : गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर यांच्या कार्यालयासमोर दि. १७ जुलै २०२३ च्या आमरण उपोषण बाबत गटशिक्षणाधिकारी सौ. लिना भागवत यांनी ५जुलै २०२३ रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलगिरी व्यक्त केली. या निवेदनाच्या प्रति मा. जिल्हाधिकारी सो. रत्नागिरी, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. रत्नागिरी, जिल्हा पोलिस अधिक्षक सो. रत्नागिरी, जि.प. शिक्षण अधिकारी रत्नागिरी, तहसिलदार सो. गुहागर, पोलिस निरिक्षक सो. गुहागर, जि.प. गटशिक्षणाधिकारी गुहागर यांना पाठविण्यात आल्या होत्या. Group education officer’s apology regarding school strike

पंचायत समिती गुहागरच्या गटशिक्षणऀधिकारी सौ. लिना भागवत व त्यांचे कर्मचारी श्री. खर्डे, श्री. दशरथ साळवी यांनी दिनांक ५जुलै २०२३ रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून सभा घेतली. यावेळी पालक व ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त करुन दिलेला कामगिरीवरील शिक्षक शैक्षणिक सत्र संपेपर्यंत इथेच याच शाळेत राहिल अशी ग्वाही दिली. कळत न कळत काही घडले असेच तर आपण सर्वांनी माफ करावे व दिनांक १७ जुलै २०२३ रोजीचे हे उपोषण आपण मागे घ्यावे अशी विनंती केली. यावेळी कमिटी, पालक व ग्रामस्थांनी आपले म्हणणे लेखी लिहून द्यावे. नंतरच आपणाला या उपोषणा संदर्भात सहकार्य करु असे सर्वानुमते ठरले. Group education officer’s apology regarding school strike

तालुक्यातील जिल्हापरिषद प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं.१ या शाळेच्या शालेय कमिटी, ग्रामस्थ व पालक यांनी विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी पंचायत समिती गुहागर गटशिक्षणाधिकारी यांचेकडे वेळोवेळी लेखी तक्रार करुनही या गंभीर गोष्टीकडे जाणून बुजुन दुर्लक्ष केले जात होते. खोडदे नं.१ इयत्ता १ ली ते ४ थी ही शाळा सेमी इंग्रजी असूनही या शाळेत ज्या शिक्षकाला सेमी इंग्रजी शिकवता येत नाही. असा शिक्षक गेली ३ वर्ष काम करीत होता यात विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान फार झाले. याबाबत शिक्षण खात्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. परंतू शिक्षण खात्याकडूनही अनेक महिने चांगला शिक्षक देण्यास दिरंगाई करण्यात आली. अधिका-यांनी शिक्षिकेवरती कोणतीही लेखी कारवाई (कार्यवाही) केली नाही. तसेच शाळेची शिक्षण विभागाने प्रयोग शाळा करुन टाकली. गटशिक्षणाधिकारी यांची चौकशी करुन या शाळेत सेमी इंग्रजी शिकविणारा शिक्षक त्वरीत देण्यात यावा. याबाबत आमरण उपोषणाचे लेखी निवेदन आणि ग्रामसभेचा ठराव शालेय कमिटी अध्यक्ष श्री. संदेश साळवी, शिक्षणतज्ञ विलास गुरव यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती गुहागर यांच्याकडे दिला. Group education officer’s apology regarding school strike
यावेळी खोडदे गावचे सरपंच श्री. लवेश पवार, शालेय कमिटी अध्यक्ष श्री.संदेश साळवी, शिक्षणतज्ञ श्री. विलास गुरव, शरद साळवी, ग्रामपंचायत सदस्या सौ. तनुजा पवार, सदस्य श्री. नाना साळवी, सौ. सुषमा पांचाळ, श्रीमती. श्रध्दा साळवी, सौ.समृध्दी साळवी, सौ. पवार, सौ.पाटील, सौ.शर्वरी साळवी, पालक सुजय पाटील, दीपक गुरव, श्री.कोळी, श्री.नेवरेकर, श्री. लवटे, सौ. संजना गुरव, श्री. हरिश्चंद्र साळवी, श्री. लोणारे आदी उपस्थित होते. Group education officer’s apology regarding school strike
